शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मिनी मंत्रालयासाठी विकास आघाडी नको

By admin | Updated: January 26, 2017 00:52 IST

भाजपाचा नेत्यांना सूचक इशारा

नाशिक : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपातीलच काही नेत्यांनी जिल्ह्णात जिल्हा विकास आघाडीची मोट बांधण्यास सुरुवात केलेली असतानाच बुधवारी (दि. २५) भाजपा प्रवक्ते माधव भंडारी यांनी मात्र भाजपा व्यतिरिक्त जिल्हा परिषदेसाठी कोणत्याही विकास आघाडीस मान्यता दिली जाणार नाही, असा सूचक इशारा दिला.  काही दिवसांपूर्वीच भाजपाच्या वतीने वसंत स्मृती पक्ष कार्यालयात भाजपा जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांनी प्रसार माध्यमांशी अनौपचारिक गप्पा मारताना काही तालुक्यांत पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांनी पक्ष चिन्हाऐवजी जिल्हा विकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढल्यास या निवडणुका काही गटांपुरत्या का होईना, बिनविरोध होण्याची शक्यता असल्याने तशी परवानगी मागितल्याचे सांगितले होते. जिल्ह्णातील कसमादे पट्ट्यातील भाजपाची काही मंडळी जिल्हा विकास आघाडीची मोट बांधण्याच्या वृत्ताला त्यामुळे बळकटी मिळाली होती; मात्र यासंदर्भात बुधवारी झालेल्या प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांच्या पत्रकार परिषदेत या विषयावर पडदा पडला. भाजपा चिन्हा व्यतिरिक्त कोणत्याही चिन्हावर अथवा आघाडीला भाजपाचा पाठिंबा राहणार नाही. जिल्हा विकास आघाडीचे जरी उमेदवार उभे राहिले तरी तेथे भाजपाचे अधिकृत उमेदवार उभे करण्यात येतील. प्रदेश पातळीवरून कोणत्याही विकास आघाडीला मान्यता देण्यात आलेली नसल्याचेही प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगितले. त्यामुळे कसमादे परिसरातील भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेल्या मात्र जिल्हा विकास आघाडी करून  अपक्ष उमेदवारी करण्याच्या तयारीत असलेल्या भाजपाच्या नेत्यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. (प्रतिनिधी)