शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तिनाथांची वारी झाली लाखाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 23:14 IST

नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखीत सहभागी वारकऱ्यांच्या संख्येने यंदा प्रथमच एक लाखाचा टप्पा ओलांडत सव्वा लाखांहून अधिक वारकऱ्यांपर्यंत मजल मारली आहे. अजून अखेरचे दोन मुक्काम बाकी असून, गावोगावच्या दिंडींमधील वाढते प्रमाण पाहता पंढरीत पोहोचेपर्यंत वारकºयांची ही मांदीयाळी दीड लाखांपर्यंत पोहोचण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देलक्षणीय सहभाग : दुष्काळी स्थितीतही पावले चालती पंढरीची वाट

धनंजय रिसोडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखीत सहभागी वारकऱ्यांच्या संख्येने यंदा प्रथमच एक लाखाचा टप्पा ओलांडत सव्वा लाखांहून अधिक वारकऱ्यांपर्यंत मजल मारली आहे. अजून अखेरचे दोन मुक्काम बाकी असून, गावोगावच्या दिंडींमधील वाढते प्रमाण पाहता पंढरीत पोहोचेपर्यंत वारकºयांची ही मांदीयाळी दीड लाखांपर्यंत पोहोचण्याची चिन्हे आहेत.ज्ञानोबा माउलींचे ज्येष्ठ बंधू आणि गुरू संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ यांच्या पालखीलादेखील माउली आणि तुकोबामहाराजांच्या पालखीइतकाच मान आहे. या दोन पालख्यांमध्ये वर्षानुवर्ष सहभागी होणाºया वारकºयांची संख्या ४ ते ५ लाखांच्या घरात असते. मात्र, त्र्यंबकेश्वरच्या समाधी स्थानापासून निघणारी निवृत्तिनाथ महाराजांची पालखी अधिक लांबून पंढरीत जात असूनदेखील या पालखीत सहभागी वारकºयांची संख्या कधी एक लाखाच्या पल्याड पोहोचली नव्हती. पण यंदा मात्र पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेपर्यंतच सव्वा लाखाच्या वर पोहोचली आहे. पंढरपूरपर्यंत ही संख्या यंदा दीड लाखावर पोहोचण्याची शक्यता आहे.‘निर्मल वारी’ अशक्यमाउली आणि तुकोबांच्या पालखीसह निवृत्तिनाथ महाराज आणि सोपानकाका पालखी यादेखील शतकानुशतके चालणाºया पालख्यांची शासनदरबारी नोंद आहे. या दोन पालख्यांसमवेत शासनाकडून अनेक मोबाइल टॉयलेटची व्यवस्था करून ठेवलेली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी ही सुविधा असल्याने त्या पालखीत सहभागी वारकºयांना ‘निर्मल वारी’ करणे शक्य होत आहे. मात्र, निवृत्तिनाथ पालखीसमवेत मोबाइल टॉयलेटच्या व्यवस्थेचे अभाव असल्याने त्यांना ‘निर्मल वारी’ संभव होऊ शकलेली नाही.‘हरित वारी’ साधलीराज्य शासनाच्या निर्देशानुसार निवृत्तिनाथ पालखीचे सर्व मानकरी आणि मंदिराचे विश्वस्त ही वारी हरित व्हावी, यासाठी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी पाच रोपांचे वृक्षारोपण तसेच सीडबॉलचे वाटप करीत पुढे जात आहेत. त्यामुळे वारी खºया अर्थाने ‘हरित वारी’ करण्याचे नियोजन योग्यप्रकारे साध्य केले जात आहेत.त्र्यंबकपासून निघताना तीस हजारत्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या समाधी मंदिरापासून ही पालखी निघते, त्यावेळी त्यात सहभागी आसपासच्या गावांमधील दिंड्यांमधील वारकरी संख्या ही तीस हजारांच्या आसपास असते. नाशिकपर्यंत त्यात अजून काही दिंड्या सहभागी झाल्याने ती संख्या चाळीस हजारावर जाते. त्यात पुढे-पुढे जात ही संख्या गतवर्षीपर्यंत ८० हजारांपर्यंत जात होती.युवा वारकºयांमध्ये भरघोस वाढयंदाच्या वारीत संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ पालखीत सहभागी वारकºयांची संख्या प्रथमच सव्वा लाखावर पोहोचली आहे. पाऊस लांबल्याने या बहुतांश भागातील पेरण्यादेखील लांबल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शेतीसाठी थांबण्याऐवजी शेतकरी आणि युवावर्ग सहभागी होण्याचे प्रमाण यंदा मोठ्या प्रमाणात वाढले आहे.- पुंडलिक थेटेनिवृत्तिनाथ पालखी समन्वयक