शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

खात्यातून परत गेलेले पैसे पुन्हा आल्याच्या खात्रीबाबत साशंकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 01:07 IST

नाशिक : वार्षिक सहा हजार रुपये अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करणाºया पंतप्रधान किसान योजनेच्या पहिल्या टप्प्यातील दोन हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्यानंतर अवघ्या काही वेळातच पुन्हा परत काढून घेण्याच्या सरकारच्या निर्णयाविषयी शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, या शेतकºयांच्या खात्यावर पुन्हा पैसे जमा झाले किंवा नाही याची खात्री करण्याची कोणतीही यंत्रणा स्थानिक पातळीवर उपलब्ध नसल्याने सरकारची घोषणा चुनावी जुमला ठरण्याची टीका होऊ लागली आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान किसान योजना : प्रशासनाकडूनही शेतकऱ्यांची दिशाभूल

नाशिक : वार्षिक सहा हजार रुपये अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करणाºया पंतप्रधान किसान योजनेच्या पहिल्या टप्प्यातील दोन हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्यानंतर अवघ्या काही वेळातच पुन्हा परत काढून घेण्याच्या सरकारच्या निर्णयाविषयी शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, या शेतकºयांच्या खात्यावर पुन्हा पैसे जमा झाले किंवा नाही याची खात्री करण्याची कोणतीही यंत्रणा स्थानिक पातळीवर उपलब्ध नसल्याने सरकारची घोषणा चुनावी जुमला ठरण्याची टीका होऊ लागली आहे. योजनेबाबत शेतकºयांच्या तक्र्रारी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे करण्यात आलेले आवाहन दिशाभूल करणारे ठरले आहे. (पान ४ वर) वारंवार संपर्क करूनही या योजनेबाबत माहिती देण्यास जिल्हाधिकारी कार्यालयात कोणीही सक्षम अधिकारी समोर आला नाही. (पान ? वर)२४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान योजनेचा पहिला हप्ता शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्याचा शुभारंभ केला. दोन हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असलेल्या शेतकºयांची संख्या नाशिक जिल्ह्णात सुमारे साडेतीन लाखांच्या आसपास असून, त्यातील पहिल्या टप्प्यात काही शेतकºयांच्या खात्यावर दोन हजार रुपये त्याच दिवशी जमा झाले, तसे लघुसंदेशही संबंधित बॅँकांकडून शेतकºयांना देण्यात आले. परंतु जिल्ह्णातील १८६ शेतकºयांच्या खात्यावर जमा झालेले पैसे अवघ्या काही वेळातच बॅँकांनी पुन्हा परत घेऊन आपल्याकडे जमा करून घेतले. याबाबत शेतकºयांनी बॅँकांना विचारणा केली असता बॅँकांनी हातवर करून सदरचे पैसे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन आॅफ इंडियाकडे बोट दाखवून हात झटकले. कृषी विभागाकडेदेखील याची काही माहिती नाही तर महसूल खात्यानेही याबाबत माहिती नसल्याचे सांगून आपली मान सोडवून घेतली. ज्या शेतकºयांच्या खात्यातील पैसे परत काढण्यात आले अशा शेतकºयांची नावे, बॅँकेचे खाते क्रमांक, आधार क्रमांक याची खात्री पुन्हा स्थानिक पातळीवरून करण्यात आल्यानंतर जवळपास १२२ शेतकºयांची माहिती पुन्हा आॅनलाइन नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन आॅफ इंडियाकडे पाठविण्यात आली आहे. परंतु या शेतकºयांना पैसे मिळाले की नाही याची खात्री करण्याची कोणतीही सोय स्थानिक पातळीवर उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकºयांकडून या योजनेविषयी संशय व्यक्त केला जात आहे. खात्यात जमा झालेले पैसे पुन्हा काढून घेतलेले अशोक लहामगे या शेतकºयाशी संपर्क साधला असता त्यांना अद्यापही पैसे मिळालेले नसल्याचे सांगण्यात आले.गॅस सबसिडीबाबत दिलगिरीघरगुती गॅस सिलिंडरची बॅँक खात्यात जमा होणारी रक्कम पंतप्रधान किसान योजनेंतर्गत दाखविण्याचा प्रताप सरकारने केला असून, गेल्या आठवड्यात गॅस ग्राहकाच्या १११५१२८ कॅशमेमोधारकाच्या खात्यावर जमा झालेले १५५.९५ रुपये बॅँक खात्यात जमा करताना चक्क पंतप्रधान किसान योजनेंतर्गत दाखविण्यात आले होते. सरकार शेतकºयांना दोन हजार रुपये देत असताना गॅस ग्राहकाला फक्त १५५ रुपयेच जमा झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले गेले. या संदर्भात वृत्त प्रसिद्ध होताच, बॅँकेने दुसºया दिवशी लघुसंदेशाद्वारे दिलगिरी व्यक्त करून सदरचे पैसे किसान योजनेचे नसल्याचा खुलासा केला आहे.