शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदी आहे; मात्र केवळ कागदावरच..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:13 IST

राज्य सरकारच्या वतीने संचारबंदी आदेश दिवस-रात्र लागू करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तालयाकडूनही या आदेशानुसार स्पष्टपणे स्थानिक ...

राज्य सरकारच्या वतीने संचारबंदी आदेश दिवस-रात्र लागू करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तालयाकडूनही या आदेशानुसार स्पष्टपणे स्थानिक पातळीवर कलम-१४४ आदेशाची अधिसूचना काढण्यात आली. या आदेशामध्ये केवळ अतिअत्यावश्यक वैद्यकीय कारणांचा अपवाद वगळता अन्य कुठल्याही कारणांनी नागरिकांना घराबाहेर पडता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार विविध अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व त्यासंबंधित कर्मचारी वर्ग वगळता अन्य कोणीही रस्त्यांवर येऊ नये, असे म्हटले आहे. मात्र, शहरात याउलटच चित्र गुरुवारी दिवसभर पहावयास मिळाले.

बुधवारी रात्रीपासून विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ‘फिक्स पॉइंट’ लावून नाकाबंदी केली जात होती, ते नाकेही गुरुवारी दिवसभर ओस पडल्याचे चित्र होते. बहुतांश नाक्यांवर तर बॅरिकेडदेखील अस्ताव्यस्त झाल्याचे पहावयास मिळाले. काही नाक्यांवरून पोलीस कर्मचारीही गायब झालेले हाेते तर ज्या ठिकाणी कर्मचारी होते, ते एका बाजूला बसून मोबाईलवर मग्न असल्याचे दिसून आले. शहर व परिसरात पोलीस गस्त गुरुवारी सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत काहीशी ‘चोख’ पहावयास मिळाली, मात्र त्यानंतर गस्त अन‌् नाकाबंदीही ढेपाळल्याची स्थिती होती.

---इन्फो--

सिग्नलवर वाहनांची गर्दी

शहरात सर्वत्र नागरिकांची रेलचेल कायम असल्यामुळे संचारबंदी असतानाही शहरातील सिग्नलवर वाहनांची गर्दी दिसून आली. यामुळे संचारबंदी कायद्याचे पालन काटेकोरपणे नागरिकांकडून करण्यात येत नसल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. बहुतांश लोक रस्त्यावर वावरत असल्यामुळे संचारबंदी आहे तरी कोठे? असाच प्रश्न अनेकांना पडला.

---इन्फो--

बाहेर पडलेल्यांची कारणे अशी...

भाजीपाला,फळे घेण्यासाठी चाललो.

किराणा माल आणायला जात आहे.

औषधी घेण्यासाठी मेडिकलमध्ये गेलो होतो.

दवाखान्यात तपासणीसाठी चाललो.