शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तासाभरात सहा सोनसाखळ्या ओरबाडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:31 IST

पोलिसांना आव्हान : शहरात ५२ ठिकाणी नाकाबंदी असूनही चोरटे फरार; खुलेआम लूट नाशिक : पोलिसांची ठिकठिकाणी नाकाबंदी, हेल्मेट, कागदपत्रांची तपासणी सुरू असतानाही सोनसाखळी चोरी करणारी टोळी शहरात पूर्णपणे सक्रिय असून, गुरुवारी (दि.१४) सकाळी अवघ्या तासाभरात सहा महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरट्यांनी ओरबाडून जणू पोलिसांना पुन्हा आव्हान दिले.

पोलिसांना आव्हान : शहरात ५२ ठिकाणी नाकाबंदी असूनही चोरटे फरार; खुलेआम लूट

नाशिक : पोलिसांची ठिकठिकाणी नाकाबंदी, हेल्मेट, कागदपत्रांची तपासणी सुरू असतानाही सोनसाखळी चोरी करणारी टोळी शहरात पूर्णपणे सक्रिय असून, गुरुवारी (दि.१४) सकाळी अवघ्या तासाभरात सहा महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरट्यांनी ओरबाडून जणू पोलिसांना पुन्हा आव्हान दिले.ऐन सणासुदीच्या काळात सोनसाखळी चोरीच्या घटनांनी डोके वर काढल्याने पोलीस प्रशासनाच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गणेशोत्सवामध्ये अशोका मार्ग, रविशंकर मार्गसह आदी परिसरांत सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. तसेच आगामी नवरात्रोत्सवाला अवघा आठवडा शिल्लक असताना शहरात सोनसाखळी चोरीच्या तासाभरात सहा घटना घडल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात सर्वत्र पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये नाकाबंदी केली जात असूनही एकही सोनसाखळी चोर पोलिसांना गळाला लागलेला नाही हे विशेष! आजच्या घटनांमध्ये प्रत्यक्षदर्शी महिलांनी दिलेल्या माहितीनुसार सोनसाखळीचोर दुचाकीवरून हेल्मेट परिधान करत आले आणि सोनसाखळी गळ्यातून हिसकावून पळ काढला. गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी तपोवनरोडवर घडली. शकुंतला पाटील (५३) या पायी जात असताना दोघा दुचाकीस्वार चोरट्यांनी येऊन त्यांच्या गळ्यातील पावणे दोन तोळ्याची सोनसाखळी हिसकावली त्यावेळी झाडीची फुले तोडत होत्या. एक घटना पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.गंगापूररोड परिसरात अशा घडल्या घटनापहिल्या घटनेत फिर्यादी चंदा पुखराज जैन (५९.रा. संचेती कॉम्पलेक्स, पंपिंग स्टेशन) या कॉलेजरोडवरील विठ्ठल मंदिर चौकातून गंगापूररोडकडे दुपारी जात असताना नामको बॅँकेसमोर एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोन चोरट्यांनी येऊन गळ्यातील १८ ग्रॅम वजनाची सोनसाखळी ओरबाडून पळ काढला. दुसरी घटना त्यापाठोपाठ याच परिसरात घडली. मालती रामचंद्र देवरे (५०,अष्टविनायक टॉवर, थत्तेनगर) यांच्या गळ्यातील १३ ग्रॅमचे मंगळसूत्र अशाच पद्धतीने चोरट्यांनी हिसकावले, तर तिसºया घटनेत उषा हरिभाऊ थेटे (इंद्रप्रस्थ सोसा. विद्याविकास सर्कल) यांच्या गळ्यातील १८ ग्रॅमची सोनसाखळी चोरट्यांनी पळविली. चौथी घटनाही गंगापूररोड परिसरातच घडल्याने संताप व्यक्त होत आहे.सावरकरनगर परिसरातील रहिवासी पुष्पा श्रीकृष्ण कुलकर्णी (६९) या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील दहा ग्रॅमची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. या घटनांमुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.