शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी प्रत्येक कुटुंबांच्या सर्वेक्षणासाठी ४०० पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 23:50 IST

कोरोनाने मालेगाव शहरात प्रवेश केला असून, पाच बाधित रुग्ण आढळून येणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे ४०० पथके तयार करून तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले.

ठळक मुद्देयंत्रणा सतर्क : बाधितांचा निवासी परिसर ‘सिल’

नाशिक/मालेगाव : कोरोनाने मालेगाव शहरात प्रवेश केला असून, पाच बाधित रुग्ण आढळून येणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे ४०० पथके तयार करून तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले.मालेगावी झालेल्या विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषी मंत्री दादा भुसे उपस्थित होते. जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, वैद्यकीय तज्ज्ञ, शिक्षक व शासकीय कर्मचारी यांचा समावेश असलेली ४०० जणांची टिम नागरिकांचे सर्वेक्षणाचे काम करणार आहे. ज्यांना लक्षणे दिसून येतील त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यात येईल. ‘कोरोना’ दारात येऊन ठेपला आहे, येणारे आठ दिवस अतिमहत्त्वाचे आहेत. मालेगावमधील प्रकार प्रथमदर्शनी सामूहिक संसर्गाचा दिसून येत आहे. प्रशासनाच्या उपाययोजना कडक राबविण्यात येणार आहेत. पाचही बाधित रुग्णांचा निवासी परिसर सिलबंद करण्यात आला आहे. या रुग्णांना कुठलीही प्रवासी पार्श्वभूमी दिसून येत नसल्यामुळे प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे. यासाठी कोम्बिंग आॅपरेशनही राबविण्यात येणार आहे. पाच पैकी एकाचा मृत्यू झाला असून, खासगी रुग्णालय पूर्णपणे क्वारंटाइन हॉस्पिटल म्हणून अधिग्रहित करण्यात आले आहे. याठिकाणी चारही रुग्णांना उपचारासाठी स्थलांतरित करण्यात येणार आहे. संचारबंदीची मुदत वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कंट्रोल रुमची तत्काळ स्थापना करावी, स्वस्त धान्य वितरणाचे नियोजन करावे, भाजीपाला वितरणासाठी मोजक्या हातगाड्यांना परवाने देऊन घरपोच भाजीपाला पोहोचवावा, स्वयंसेवी संस्थांची मदत एका छताखाली आणून प्रशासनामार्फत गरजूपर्यंत पोहोचविण्याचे सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिल्या.यानंतर मंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी मांढरे यांच्यासह डॉक्टर व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी रुग्णालयास भेट देत डॉक्टर व नर्सिंग स्टाफचे मनोबल वाढवले.... तर फौजदारी कारवाईराज्याचे कृषिमंत्री दादा भुसे म्हणाले, रेशन, भाजीपाला, आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना तयार करत असून, नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. धान्य वितरण व्यवस्थेमध्ये साठेबाजी करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचे निर्देश मंत्री भुसे यांनी दिले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य