शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुक्यात २१३ मतदान केंदे्र

By admin | Updated: February 19, 2017 23:33 IST

तयारी अंतिम टप्प्यात : वोटर स्लिपचे महसूल यंत्रणेकडून वाटप करण्याचे नियोजन

सिन्नर : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी येत्या मंगळवारी (दि. २१) मतदान होत आहे. त्यासाठी तालुक्यात २१३ मतदान केंद्रे असणार आहेत. मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणेची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी विठ्ठल सोनवणे, सहायक निवडणूक अधिकारी मनोजकुमार खैरनार यांनी दिली.  जिल्हा परिषदेच्या सहा तर पंचायत समितीच्या १२ गणांसाठी तालुक्यातील एक लाख ९७ हजार ६२० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात एक लाख चार हजार ३२१ पुरुष, तर ९३ हजार २९९ महिला मतदान करतील. जिल्हा परिषदेच्या सहा जागांसाठी १८ तर पंचायत समितीच्या १२ जागांसाठी ४१ उमेदवार रिंगणात आहे. भाजपा, शिवसेना यांनी संपूर्ण जागेवर स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. तर कॉँग्रेस-राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेच्या तीन जागांवर उमेदवार दिले आहेत. मनसेने एका गटासाठी उमेदवार दिला आहे. काही गटात तिरंगी, तर दोन गटात दुरंगी लढत पहायला मिळत आहे. खरी लढत भाजपा व शिवसेना यांच्यात रंगत असल्याचे चित्र आहे.  २१३ मतदान केंद्रांसाठी ४२६ मतदानयंत्रे असणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी स्वतंत्र मतदानयंत्रे असणार आहेत, तर २४ मतदानयंत्रे राखीव असणार आहेत. मंगळवारी (दि. २१) होणाऱ्या मतदानासाठी १२६४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, १३२ कर्मचारी राखीव म्हणून आहेत. एकूण १३९६ कर्मचारी निवडणूक कामासाठी सज्ज झाले आहेत. प्रत्येक १२ गणांसाठी स्वतंत्र क्षेत्रिय अधिकारी असणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी व एक शिपाई असे पाच कर्मचारी असणार आहेत, तर कमी मतदान असणाऱ्या १४ केंद्रांवर प्रत्येकी तीन कर्मचारी असणार आहेत. मतदान करण्याची वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत असणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी स्वतंत्र मतदानयंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारांना दोन स्वतंत्र यंत्रांवर प्रत्येकी एक मत द्यावे लागणार आहे. प्रत्येक मतदानयंत्रात शेवटचे बटण ‘नोटा’चे असणार आहे.  (वार्ताहर)