शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या धोरणाविरोधात संताप

By admin | Updated: August 21, 2016 00:52 IST

महावितरणच्या धोरणाविरोधात संताप

 विंचूर : येथील पांडुरंग नगरमधील रोहित्र गेल्या दोन महिन्यांपूर्वी जळाले असून, दुसऱ्या रोहित्रावरून वीजपुरवठा केला जात आहे. मात्र विजेच्या कमी दाबामुळे येथील घरांमधील विद्युत उपकरणे जळण्याचे प्रकार वाढल्याने महावितरणच्या ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.रोहित्र बसविण्याची मागणी केली असता नागरिकांकडे पैशांची मागणी केली जात असून, गेल्या दोन महिन्यांपासून महावितरणचे वरिष्ठ अधिकारीही उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने येथील ग्राहकांनी ग्राहक न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.महावितरण कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे येथील रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पांडुरंग नगरमधील सुमारे शंभरच्यावर रहिवाशांना गत दोन महिन्यांपासून वितरण विभागाकडून शॉक दिला जात आहे. येथील घरांमधील टीव्ही, फ्रीज, विद्युत दिवे यांसह इतर इलेक्ट्रिक उपकरणे जळण्याचे प्रकार वाढले आहेत. रहिवाशांनी वेळोवेळी महावितरणच्या अभियंत्यांकडे तक्रार केली असता चांडवड येथून रोहित्र आणावयाचे असून, त्यासाठी पैशांची तजवीज करण्याचे सांगितले जात असल्याने वीजबिल नियमित भरणाऱ्या ग्राहकांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. येथील सर्व रहिवासी नोकरदार असल्याने वीजबिल थकण्याचा प्रश्न नसताना नियमित बिले भरणाऱ्या ग्राहकांवर अन्याय होत असल्याची भावना रहिवाशांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, येथील नागरिकांनी सांगितले की, रोहित्र बदलण्यासाठी छुप्या मार्गाने पैशांची मागणी करणे गैर असून कर्मचाऱ्यांनी राजरोजपणे पैसे मागावे, त्याची पूर्तता करण्यास येथील रहिवासी तयार आहे. किमान शासनालासुद्धा कळेल की, नियमतिपणे वीजबिल भरणा-या ग्राहकांची कशी पिळवणूक होत असल्याचे जिवंत उदाहरण आहे. येत्या दोन दिवसांत नवीन रोहित्र न बसविल्यास ग्राहक न्यायालयात दावा दाखल करण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे. (वार्ताहर)