शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
2
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
3
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
4
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
5
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
6
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
7
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
8
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
9
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
10
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
11
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
12
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
13
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
14
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
15
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
16
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
17
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
18
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
19
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
20
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.

...तर पुन्हा स्वातंत्र्यासाठी लढावे लागेल

By admin | Updated: August 15, 2014 00:53 IST

...तर पुन्हा स्वातंत्र्यासाठी लढावे लागेल

 

  प्रतिनिधी नाशिक, दि. १४ : १५ आॅगस्ट हा आपल्या राष्ट्राच्या इतिहासातील एक अभिमानाचा दिवस. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून किती तरी स्वातंत्र्य-सैनिकांनी आपल्या प्राणाची आहूती दिली. परंतु अलीकडे हा दिवस उत्साहात, आनंदात साजरा करणे हळूहळू बंद होत आहे, याउलट एक सुट्टीचा दिवस म्हणून बरेचदा त्याकडे पहिले जात असल्याने आपण स्वातंत्र्यप्रती किती गांभीर्य बाळगुण आहोत, असा विचार करणे गरजेचे असल्याचे तरुणांनी सांगितले. देशाची सद्यस्थिती पाहता चांगल्या बाबींपेक्षा वाईट प्रवृत्तींनाच अधिक पाठबळ दिले जाते. भ्रष्टाचार कमी करण्याऐवजी तो वाढतच असल्याने देशाची प्रगती नव्हे तर अधोगती होत असल्याचा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे देशाची परिस्थिती बदलायला हवी. अन्यथा पुन्हा एकदा स्वातंत्र्याची लढाई लढावी लागणार असल्याचे तरुणांनी सांगितले. नव्या पिढीची ताकदनवी पिढी विचार करणारी असून जी पिढी स्वत:च्या उत्कर्षासाठी दिवस रात्र मेहनत घेऊन आपला आयुष्य उभारतात त्या पिढी कडून हा देश ही घडण्याची अपेक्षा आहे. कुठलाही देश एका रात्रीत उभा राहत नाही, त्यासाठी वर्षानुवर्षे कठोर मेहनत घ्यावी लागते, भारतात तर महापुरूषांनी यासाठी मेहनत घेतली आहे. त्यामुळे गरज आहे फक्त त्यांच्या विचारांची कास धरून नवे पाऊल उचलण्याची. त्यासाठी संगळ्यांनीच प्रयत्न करायला हवेत. प्रयत्न छोटा आहे किंवा मोठा आहे याचा फारसा विचार न करता प्रयत्न करण्यावर भर देणे आवश्यक आहे. त्यामुळे आपणाला हे करणे शक्य नाही, हा दुर्बल विचार मनातून काढून टाकण्याची गरज असल्याचे अमित निकुंभ यांनी सांगितले. महापुरूषांच्या विचाराची व्हावी आठवणसुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास असणारे आम्ही एवढे निष्प्राण, निस्तेज कसे? कधी ऐकू येणार ती आरोळी, भारत माता की म्हंटल की कधी सबंध देश एका आवाजात ‘जय’ चा उदघोष करणार? प्रत्येकाने आपल्या लहानपणी पाहिलेले भारत देशाचे स्वप्न कधी साकार होणार? ज्या महापुरु षांची भाषणे आम्ही द्यायचो, ऐकायचो कधी त्यांच्या विचारांना आम्ही आमच्या जीवनात खरं स्थान देणार आहोत काय? कित्येक स्वातंत्र्य दिन आले, येतील आणि जातील पण त्या सुंदर देशाचे स्वप्न साकार करण्याचा बदल प्रत्यक्षात येईल काय? असे असंख्य प्रश्न उपस्थित होत असल्याने आपल्याला पुन्हा महापुरूषांच्या विचाराची आठवण व्हायला हवी असे प्रशांत दिक्षीत यांनी सांगितले. निवडणुका म्हणजे राष्ट्रीय सणनिवडणुका म्हणजे आमच्या देशात राष्ट्रीय सनासारख्या झाल्या आहेत, दर वर्षांनी, महिन्यांनी कसली न कसली निवडणूक घ्यायची, लोकांच्या कल्याणाची भाषा करायची, आम्ही ही ती ऐकायची आणि टाळ्या वाजवून पुन्हा ये रे माझ्या मागल्या! तेच ते चालू आहे, १ नाही २ नव्हे तर तब्बल गेल्या ६५ वर्षापासून ही पद्धत सुरू आहे. स्वतंत्र भारतात तीन पिढ्या बदलल्या पण आमच्या समस्या त्याच होत्या आणि आज ही त्याच आहेत; किंबहुना त्या समस्यांनी आता महाकाय स्वरूप घेतलं आहे. देश तर स्वतंत्र झाला, पण आम्ही अजून ही गुलामच राहिलो. स्वत:च्या स्वातंत्र्य साठी स्वत:लाच लढावे लागते, पण लढणे म्हणजे काय हेच आता आम्ही विसरलो असल्याचे पंकज पाटील यांनी सांगितले.