शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

‘...तो हमारे अब्बू की जान बच जाती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:16 IST

------- (झाकीर हुसेन दुर्घटना-विशेष पानासाठी) अझहर शेख, लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : ‘हमारे अब्बू को ॲडमिट किये हुये, तीन ...

-------

(झाकीर हुसेन दुर्घटना-विशेष पानासाठी)

अझहर शेख,

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : ‘हमारे अब्बू को ॲडमिट किये हुये, तीन दिनही हुये थे, लेकिन उनकी हालत काफी सुधर रहीं थी, डॉक्टरभी बोले की दो दिन बाद डिस्चार्ज मिल जायेंगा, उनका ऑक्सिजन सॅच्युरेशन भी अच्छा हुवा था... लेकिन अचानक ये हादसा हुवा और सब कुछ खत्म...! सिलिंडर लाने-लेजाने तक जो वक्त गुजरा उसमे अब्बू हमेशा के लिये हमें छोड के चले गये....! या भावना त्यांच्याच शब्दांत दुर्घटनेचे बळी ठरलेले भय्या सांडूभाई सय्यद यांच्या कुटुंबीयांच्या आहेत.

येथील मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात महिनाभरापूर्वी बुधवारी (दि. २१) दुपारी अचानकपणे ऑक्सिजन टाकीला गळती लागली अन‌् अनर्थ घडला. रुग्णालयात मृत्यूच्या तांडवासोबतच नातेवाइकांचा सुन्न करणारा आक्रोश सुरू झाला. यावेळी सय्यद यांची दोन्ही मुले नदीम व साहील तसेच त्यांचे मित्र मुस्तकीम कुरेशी, ताबीश सय्यद, मोईन शेख, सकलेन शेख, इरफान कुरेशी यांनीही दुचाकींनी धावाधाव करीत घरी असलेला निम्मा भरलेला ऑक्सिजन सिलिंडर तसेच गॅरेजमधील एक असे दोन सिलिंडर तत्काळ रुग्णालयात आणले. भय्या सांडूभाई सय्यद (५९, रा. रॉयल कॉलनी, पखाल रोड) यांना ऑक्सिजन लावला. हे दोन्ही सिलिंडर निम्मेच असल्यामुळे ते लवकर संपणार असल्याने हे तरुण पुन्हा सातपूर औद्योगिक वसाहतीकडे धावले. तेथून पुन्हा रुग्णालयात येईपर्यंत वेळ लागला आणि यादरम्यानच ऑक्सिजनचा दाब कमी होत गेल्याने सय्यद यांचा श्वास कायमचा थांबला. ‘लोकमत’कडे आपल्या भावना व्यक्त करताना त्यांच्या दोन्ही मुलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.

----इन्फो----

आमचा आधारवड हरपला

अत्यंत मध्यमवर्गीय असलेल्या सय्यद कुटुंबीय मूळ गाव येवला तालुक्यातील राजापूर येथील. कुटुंबप्रमुख भय्या सय्यद हे ड्रायव्हर होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सून, जावई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. आमचा आधार या दुर्घटनेने कायमचा हिरावून नेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. वडिलांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, नियतीने त्यांच्या प्रयत्नांना अखेरपर्यंत यश येऊ दिले नाही.

---इन्फो--

....अन् ती महिला रुग्ण बचावली!

‘दुसरा सिलिंडर लेके हम हॉस्पिटल में पहुंचे तब हमारे अब्बू रुख्सत हों चुके थे, और वॉर्ड में दुसरे बेड पें लेटी लेडीज पेशंट की सांसे छूटने लगी थी. ये देखकर तुरंत हमने वो सिलिंडर वो पेशंट को दे दिया और उसकी जान बच गयी.’ हा प्रसंग नदीम व साहील या भावंडांनी बोलून दाखविला. आपल्या वडिलांना गमावल्याचे दु:ख असतानाही, दुसऱ्या व्यक्तीचे प्राण वाचावेत, या भावनेतून त्यांनी दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेत दाखविलेले प्रसंगावधान त्या महिला रुग्णाला जीवदान देणारे ठरले.

फोटो : nsk वर भैय्या सैय्यद नावाने सेंड केला आहे.