शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

...तर स्टेअरिंगवर येणार डुलकी

By admin | Updated: December 9, 2015 23:39 IST

नाशिकचा मुक्काम नको रे बाप्पा : ठक्कर बाजार बसस्थानकामधील विश्रांतीगृह बनले समस्यांचे आगार

नाशिक : ‘एक डुलकी एक अपघात’, ‘ नजर हटी दुर्घटना घटी’, ‘मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक’ ‘समय मौल्यवान हैं, जीवन अमूल्य हैं’ वाहतुकीसंदर्भात प्रबोधन करणारे असे विविध घोषवाक्यांचे फलक महामार्गांवर नजरेस पडतात. हे फलक लावण्यामागचा उद्देश एकच की रस्ते अपघात टाळले जावे, वाहतुकीच्या नियमांचे वाहनचालकांनी पालन करावे; मात्र अनेकदा याकडे वाहनचालकांचे दुर्लक्ष होऊन अपघातांना निमंत्रण मिळते. असेच काहीसे दुर्लक्ष परिवहन महामंडळाकडूनही होत असून वाहनचालकांना पुरेशी झोप मिळेल असे विश्रांतीगृहदेखील उपलब्ध करून देण्यास प्रशासन अपयशी ठरत आहे. वाहनचालकांना पुरेशी झोपही बसस्थानकाच्या विश्रांतीगृहामध्ये घेणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे संध्याकाळी-रात्रीच्या वेळी प्रवाशांची बसेसद्वारे वाहतूक करत असताना स्टेअरिंगवर ‘डुलकी’ लागण्याची चिंता बसचालकांना सध्या सतावत आहे.ठक्कर बाजार नवीन मध्यवर्ती बसस्थानकाच्या विश्रांतीगृहात प्रवेश करताच स्पष्ट होते. रात्रपाळीच्या बसफेऱ्या करणाऱ्या चालक-वाहकांसाठी तयार करण्यात आलेले विश्रांतीगृह हे केवळ नावापुरतेच आहे. यामुळे राज्यभरातून येथे येणाऱ्या चालक-वाहकांच्या उरात नाशिकच्या मुक्कामाने धडकी भरते. ना पिण्याचे पाणी ना वापरायचे पाणी, प्रसाधनगृहाची दुर्दशा, अपुरी जागा, डासांची गुणगुण, दुर्गंधीचे वातावरण अशा एक ना अनेक समस्यांचे ‘ग्रहण’ लागल्याने विश्रांतीगृह हे समस्यांचे आगार बनल्याचे चित्र आहे.‘एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास’ असा जनसामान्यांना विश्वास आहे. एका चालकाच्या खांद्यावर किमान ५० प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. बसमधील प्रत्येक प्रवाशाला त्याच्या इच्छितस्थळापर्यंत सुरक्षित पोहोचविण्यासाठी कौशल्यपूर्ण वाहतूक करण्यावर बहुतांश चालक भर देतात. महामार्गावर असणाऱ्या ‘एक डुलकी एक अपघात’ या सूचनाफलकानुसार अनेकदा एसटीला अपघात झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत; मात्र याबाबत राज्य परिवहन महामंडळ ‘दक्षता’ घेत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मध्यरात्री बसच्या फेऱ्या असलेल्या चालकाला जर दुपारच्या वेळी पुरेशी झोप मिळत नसेल तर रात्रीच्या सुमारास वाहतूक करताना त्याला डुलकी येणे स्वाभाविक आहे. याबाबत महामंडळाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. मध्यवर्ती बसस्थानकात राज्यभरातून बसेस येतात, त्यामुळे त्या बसचालकांसाठी सुसज्ज असे अद्ययावत विश्रांतीगृह असणे गरजेचे आहे. कारण या बसचालकांवरच रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची धुरा आहे. मध्यवर्ती नवीन बसस्थानकातील विश्रांतीगृहाची अस्वच्छता, दुर्गंधीमुळे ‘गोठा’च झाला आहे. (प्रतिनिधी)