शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

..अखेर पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना लागला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:18 IST

नाशिक पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाणे, शहर वाहतूक शाखा गुन्हे शाखा, विशेष शाखा, नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या पाचशेहून अधिक ...

नाशिक पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाणे, शहर वाहतूक शाखा गुन्हे शाखा, विशेष शाखा, नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या पाचशेहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर त्यांच्या नियमाने बदल्या केल्या जातात. मात्र, नाशिक पोलीस आयुक्तालयात पाच वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ झालेल्या कर्मचाऱ्यांचे अर्ज घेऊन महिना लोटला तरी कार्यकाळ पूर्ण झालेल्या कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या नसल्याने कर्मचारी बदलीच्या प्रतीक्षेत होते.

काल मंगळवारपासून बदलीप्रक्रिया सुरू झाली असून, त्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार व पोलीस शिपाई यांच्या बदल्यांचे काम कागदोपत्री सुरू केले आहे, असे समजते.

पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड, अंबड, देवळाली कॅम्प, भद्रकाली, आडगाव, पंचवटी, उपनगर, सरकारवाडा, गंगापूर यासह विशेष शाखा, गुन्हे शाखा, नियंत्रण कक्ष या ठिकाणी कार्यरत असलेल्या अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. शासकीय नियमानुसार, त्यांच्या बदल्या केल्या जातात, ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी पोलीस प्रशासनातर्फे अर्ज मागविले होते. सदर कर्मचाऱ्यांचे अर्ज घेऊन महिना लोटला होता.

येत्या आठवड्यात पोलीस कर्मचाऱ्यांचे बदली गॅझेट प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. पोलीस आयुक्तालय कार्यालयामार्फत बदलीप्रक्रिया सुरू केल्याने विविध पोलीस ठाण्यात कार्यकाळ पूर्ण झालेल्या बदलीपात्र शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांना आता नवीन बदली झालेल्या ठिकाणी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.