शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

आयेशानगर भागातून दुचाकीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:16 IST

---- दुचाकी दुभाजकावर धडकून तरूण ठार मालेगाव : मुंबई - आग्रा महामार्गावर झोडगे शिवारात दुचाकी दुभाजकावर धडकून झालेल्या अपघातात ...

----

दुचाकी दुभाजकावर धडकून तरूण ठार

मालेगाव : मुंबई - आग्रा महामार्गावर झोडगे शिवारात दुचाकी दुभाजकावर धडकून झालेल्या अपघातात शाहीद सिराजुद्दीन शेख याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी शेख सिराज शेख अलीमुद्दीन यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शाहीद हा दुचाकी क्रमांक एमएच ४१ एसी ०२४० ही मालेगावकडून झोडगेकडे जात असताना दुभाजकावर धडकला. यावेळी त्याला गंभीर दुखापत झाली. धुळे येथील रूग्णालयात उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास हवालदार बच्छाव करीत आहेत.

----

महिलेचा छळ करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा

मालेगाव : वाहन घेण्यासाठी माहेरून दोन लाख रूपये आणावेत म्हणून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या पतीसह चौघा जणांविरुद्ध कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अनिता गोविंद जाधव रा. खडकी या महिलेने फिर्याद दिली आहे. माहेरून पैसे आणावेत म्हणून पती गोविंद नानाजी जाधव व इतर चौघा जणांनी शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार सोनवणे करीत आहेत.

----

सोयगाव नववसाहत भागात घरफोडी

मालेगाव : सोयगाव नववसाहत भागात घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने दहा हजार रूपयांची रोकड चोरून नेली आहे. या प्रकरणी उमेश प्रकाश मोरे यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरफोडी करुन रोकड चोरून नेली आहे. पुढील तपास हवालदार डिंगर हे करीत आहेत.

----

किदवाई रोडवरुन दुचाकी लंपास

मालेगाव : शहरातील भारत बाजाराच्या प्रवेशद्वारावर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. या प्रकरणी करण रवी अग्रवाल यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या मालकीची दुचाकी क्रमांक एमएच ४१ एपी २५९९ ही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. पुढील तपास एस. बी. पाटील हे करीत आहेत.

----

अत्याचार करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

मालेगाव : तालुक्यातील रावळगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दीपक संतोष सोनवणे याचेविरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यांच्या १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सोनवणे यांनी अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजपूत हे करीत आहेत.