शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी दोन दुचाकींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:11 IST

---- कटरने वार करणाऱ्या तिघा जणांविरुद्ध गुन्हा मालेगाव : शहरातील कुंभारवाडा भागात किरकोळ कारणावरून शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने व ...

----

कटरने वार करणाऱ्या तिघा जणांविरुद्ध गुन्हा

मालेगाव : शहरातील कुंभारवाडा भागात किरकोळ कारणावरून शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने व कटरने वार करून शाहीदखान प्यारेखान पठाण याला जखमी केल्याप्रकरणी रफिक रशीद, अमन, मुमजात (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्या विरुद्ध किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार एस. बी. काळे करीत आहेत.

----

ठार मारण्याचा प्रयत्न, सहा जणांविरुद्ध गुन्हा

मालेगाव : येथील एका रुग्णालयात विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सासरच्या सहा जणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डाॅ. वेलंतिना किरण पाटील यांनी फिर्याद दिली आहे. विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न करणारा पती डॉ. किरण बारकू पाटील याच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अहिरे करीत आहेत.

----

चाळीसगाव फाटा परिसरात पाच जनावरे जप्त

मालेगाव : कत्तलीच्या हेतूने पिकअपमध्ये जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोन जणांना तालुका पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच जनावरे व पिकअप जप्त केली आहे. चाळीसगाव फाटा सायने शिवारातून पिकअप (क्रमांक एमएच ०४ जीए २३०९)मधून ५ जनावरांची वाहतूक करताना आबिद बिलाल शेख, सलमान उस्मान मुल्ला हे दोघे आढळून आले. याप्रकरणी पोलीस हवालदार पन्नालाल बागूल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार एस. पी. बच्छाव करीत आहेत.

----

मळगाव शिवारातून जनावरांची चोरी

मालेगाव : तालुक्यातील मळगाव येथील ३० हजार रुपये किमतीची जनावरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी मनोहर भिवसन भोसले या शेतकऱ्याने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या मालकीचे घराजवळ बांधलेली जनावरे अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहेत. पुढील तपास हवालदार कैलास गुजर करीत आहेत.

----

नशेच्या गोळ्या, औषधी बाळगणाऱ्याला अटक

मालेगाव : येथील मुंबई-आग्रा महामार्गालगत नशेच्या गोळ्या व औषधी बाळगणाऱ्या मोहंमद रिजवान मोहंमद मुस्तफा याला तालुका पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १ हजार ८० रुपये किमतीची गुंगीचे औषधी जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन निरीक्षक प्रशांत ब्राह्मणकर यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास हवालदार श्याम खैरनार करीत आहेत.

----

विनयभंग करणाऱ्या चौघा जणांविरुद्ध गुन्हा

मालेगाव : तालुक्यातील ज्वार्डी येथे महिला शेतात काम करीत असताना दत्तात्रय नथा दैतकार यांनी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले, तर कृषिप्रसाद दैतकार, यशोदाबाई दत्तात्रय दैतकार, प्रणाली दत्तात्रय दैतकार यांनी पीडित महिलेच्या पतीला शिवीगाळ, मारहाण करून दमदाटी केली. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. पुढील तपास हवालदार गुजर करीत आहेत.

----

अपहरण करून मारहाण, चौघा जणांविरुद्ध गुन्हा

मालेगाव : शहरातील करीमनाका भागातून मकदूम अशरफ अख्तर अजीज याचे अपहरण करून बंदुकीचा धाक दाखवून गंभीर स्वरूपाची मारहाण करणाऱ्या मेहताबअली शौकतअली, सुफियानअली शौकतअली, जावेद ऊर्फ अज्जू कालिया मोहंमद यासीन व एका अनोळखीविरुद्ध आयेशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक पी. के. वाघमोडे करीत आहेत.

----