शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

चोरी चोरी.... चुपके चुपके!

By admin | Updated: February 14, 2016 23:27 IST

व्हॅलेंटाइन्स डे : पोलिसांची नजर चुकवून प्रेमीयुगुलांचे ‘सेलिब्रेशन’

नाशिक : पोलिसांच्या नजरा चुकवत महत्प्रयासाने आपल्या जिवलगाला भेटून मनातल्या गुजगोष्टींना वाट मोकळी करून देत प्रेमीयुगुलांनी आजचा ‘व्हॅलेंटाइन्स डे’ संस्मरणीय केला. पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करूनही शहरालगतच्या प्रेक्षणीय स्थळांवर ‘चोरी चोरी चुपके चुपके’ भेटत, जोडीदाराला भेटवस्तू देत प्रेमवीरांनी हा दिवस ‘सेलिब्रेट’ केला. सोशल मीडिया कितीही प्रभावी झाला असला, तरी प्रत्यक्ष भेटीचा आनंद निराळाच. त्यामुळे प्रेमीयुगुलांनी आजच्या ‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या भेटीचे नियोजन आधीच करून ठेवले होते. यंदाचा ‘व्हॅलेंटाइन्स डे’ रविवारी आल्याने काहींची चांगलीच गोची झाली. एरवी महाविद्यालयात जाण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या तरुणाईला आज मात्र सुटीमुळे खास कारणे शोधावी लागली, तर सुटी असल्याने अनेकांना निवांत भेटीची मोकळीक मिळाली. जोडीदारासाठी गुलाबाची फुले, चॉकलेट्स, टेडीसह अन्य भेटवस्तू आधीच खरेदी करून ठेवण्यात आल्या होत्या. पोलिसांच्या नजरा चुकवत ठरलेल्या ठिकाणी भेटून या वस्तूंचे आदानप्रदान करीत प्रेमीयुगुलांनी आजचा दिवस यादगार करून टाकला. दरम्यान, ‘व्हॅलेंटाइन्स डे’निमित्त शहरातील प्रेक्षणीय ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वेगाने धावणाऱ्या दुचाकींवर कारवाई केली जात होती. सोमेश्वर, आसारामबापू पूल, गंगापूररोड, पांडवलेणी, फाळके स्मारक, तपोवन, गंगापूर धरण आदि ठिकाणी प्रेमीयुगुले दिसून येत होती. उद्यानांमध्येही मोक्याच्या जागा तरुणाईने अडवल्या होत्या. महामार्गालगतची हॉटेल्स, आइस्क्रीम पार्लर्स, कॉफी शॉप्समध्ये तरुण-तरुणींचे घोळके दिसत होते, तर काही प्रेमवीरांनी चित्रपटगृहांमध्ये प्रेमदिन साजरा केला. (प्रतिनिधी)