शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

गंगा गोदावरी मंदिरातील दागिने चोरीस

By admin | Updated: November 22, 2015 22:54 IST

गंगा गोदावरी मंदिरातील दागिने चोरीस

पंचवटी : घरफोड्या, भुरट्या चोऱ्या करण्यापाठोपाठ आता चोरट्यांनी देवदेवतांच्या अंगावरील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवरही डल्ला मारण्यास सुरुवात केल्याने भाविकांत नाराजी पसरली आहे.रामकुंड येथे असलेल्या पुरातन गंगा गोदावरी मंदिरातील देवी मूर्तीच्या अंगावरील एक ग्रॅम वजनाचे दागिने, तसेच दानपेटीतील चिल्लर लंपास केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या भागात नागरिकांचा राबता मोठ्या प्रमाणात असतो. परंतु देवी मंदिरात अशी चोरी होत असेल तर येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चोरट्यांनी देवीच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्याने आता चोरट्यांच्या रडारवर मंदिरे असल्याचे दिसत आहे. गंगा गोदावरी मंदिरात झालेल्या चोरी प्रकरणी हेमंत तळाजिया यांनी पंचवटी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. रामकुंड येथे देवीचे मंदिर असून, शनिवारी पहाटेच्या सुमाराला अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या दोन्ही दरवाजांचे कडी-कोयंडे तोडून आत प्रवेश केला व अंगावरील दागिने चोरले. त्यानंतर चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडण्याचाही प्रयत्न केला; मात्र ती तोडता येत नसल्याने त्यातील अंदाजे बाराशे रुपयांची चिल्लर चोरून नेली. पहाटेच्या सुमाराला काही ब्रह्मवृंद नेहमीप्रमाणे रामकुंडावर आल्यानंतर मंदिराचा दरवाजा उघडा दिसला व चोरी झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ मंदिराच्या पुजाऱ्यांना माहिती कळविली. या घटनेमुळे गोदाकाठावरील मंदिरांच्या सुरक्षितेच्या प्रश्नाविषयी चर्चा सुरू झाली आहे. (वार्ताहर)