शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय वनाधिकारी कार्यालयात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:12 IST

----- कामगाराचा इमारतीवरून कोसळून मृत्यू नाशिक : सेंट्रिंगचे काम करताना इमारतीवरून कोसळल्याने रामकिशोर बेनीमाधव यादव (३४, रा. हिरावाडी) या ...

-----

कामगाराचा इमारतीवरून कोसळून मृत्यू

नाशिक : सेंट्रिंगचे काम करताना इमारतीवरून कोसळल्याने रामकिशोर बेनीमाधव यादव (३४, रा. हिरावाडी) या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. हिरावाडी परिसरातील गोकुळधाम सोसायटीचे काम करताना यादव यांचा तोल जाऊन उंचावरुन ते खाली पडले. त्यात गंभीर मार लागल्याने, त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

----

रेल्वेच्या धडकेत युवक ठार

नाशिक : लहवित शिवारातील रेल्वे रूळ ओलांडत असताना, रेल्वेच्या धडकेत एका ३१वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रात्री सव्वाआठच्या सुमारास हा युवक रेल्वे रुळावर अचानकपणे पडला. त्याच वेळी रेल्वे आल्याने त्या खाली सापडून तो गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडला. उपस्टेशन प्रबंधक आदित्य कुमार यांनी या प्रकरणी पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

---

चोरट्यांनी तीन दुचाकी लांबविल्या

नाशिक : शहर व परिसरातून दुचाकी चोरी करण्याचे सत्र सर्रासपणे सुरूच आहे. पंचवटी, गंगापूर, म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतून प्रत्येकी एक याप्रमाणे तीन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्या. या प्रकरणी सागर विलास शिरसाठ यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ते राहत असलेल्या स्नेहल सोसायटीच्या आवारातून त्यांची पल्सर दुचाकी (एम.एच१५ जीएस६२२८) अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली. दुसऱ्या घटनेत दिलीप गणेश वाघ यांची पल्सर दुचाकी (एम.एच१५ ईसी७४८६) अज्ञात चोरट्यांनी मखमलाबाद रोडवरील राजपाल कॉलनीमधून लंपास केली. तिसऱ्या घटनेत थत्तेनगर गंगापूररोड येथील एका मॉलच्या वाहनतळातून चोरट्यांनी फिर्यादी रोहन राजाराम हिरे यांची दुचाकी (एम.एच१५ डीपी९९९३) चोरट्याने पळवून नेली.