शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांचे विघ्न : क्रेनसह ट्रकच्या बॅटऱ्या चोरीला; दुसºयाच दिवशी काम ठप्प ‘सुंदर नारायण’चा कळस उतरविला, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:46 IST

नाशिक : राज्य पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक असलेल्या शहरातील अतिप्राचीन सुंदर नारायण मंदिराच्या देखभाल दुरुस्तीचे काम पहिल्या टप्प्यात शासकीय स्तरावर हाती घेण्यात आले आहे.

ठळक मुद्देपुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेप्रत्यक्षरीत्या मंदिराच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले गेले

नाशिक : राज्य पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक असलेल्या शहरातील अतिप्राचीन सुंदर नारायण मंदिराच्या देखभाल दुरुस्तीचे काम पहिल्या टप्प्यात शासकीय स्तरावर हाती घेण्यात आले आहे. दोन दिवसांपासून मंदिराचे जुने दगड क्रेनच्या सहाय्याने उतरविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मंदिराचा मुख्य कळस उतरविल्यानंतर रात्रीच्या वेळी चोरट्यांनी वाहनांच्या बॅटºया पळविल्याने शनिवारी (दि.५) दिवसभर काम ठप्प होते.शहराच्या मुख्य बाजारपेठांपैकी एक असलेल्या रविवार कारंजा भागात अहल्यादेवी होळकर पुलाला लागून असलेले सुंदर नारायण मंदिर हे राज्याच्या पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. कारण हे मंदिर इसवी सन पूर्व १६७८ अर्थात १७५६ साली पेशव्यांचे सरदार गंगाधर यशवंतराव चंद्रचूड यांनी बांधले होते. मंदिराच्या मुख्य शिखराची उंची सुमारे ६० फूट इतकी आहे. शिखर, गर्भगृह, मंडप, मुख्य मंडप अशी या स्मारकाची रचना आहे. पहिल्या टप्प्यात या रचनेनुसार सुमारे पावणेपाच कोटींचा निधी पुरातत्व विभागाकडून प्राप्त झाला आहे. त्यानुसार दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मंदिराजवळ जादा क्षमतेच्या वीजवाहिन्यांचा विद्युतपुरवठा करणारे रोहित्र असल्यामुळे ते स्थलांतरित करण्यासाठी २४ महिन्यांच्या कालावधीपैकी सहा महिन्यांचा कालावधी गेला. त्यानंतर प्रत्यक्षरीत्या मंदिराच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले गेले. जुने दगड पूर्णपणे निकृष्ट होऊन धोकादायक ठरत असल्याने काढून घेण्यात येत असून, त्या ठिकाणी नव्याने तशाच आकाराचा व नक्षिकाम असलेला दगड लावला जाणार आहे. मंदिराचे सर्वच दगड या दुरुस्तीच्या कामात काढून घेतले जाणार नाहीत, असे पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. त्यानुसार क्रेन लावून संबंधित ठेकेदाराकडून दोन दिवसांपूर्वी कामाला सुरुवात करण्यात आली; मात्र शिखरावरील कळस उतरविल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी रात्रीतून क्रेनसह दोन्ही मालवाहू ट्रकच्या बॅटºया लंपास केल्याने कामामध्ये विघ्न आले. परिणामी शनिवारी दिवसभर दगड उतरविण्याचे व घडविण्याचे काम ठप्प राहिले.