नाशिक : शहर बसने प्रवास करीत असताना चोरट्यांनी बॅगेतील रक्कम चोरून नेल्याची घटना शालिमार परिसरात घडली आहे़ पवननगर येथील रहिवासी विश्वनाथ किसनराव मोरे (२७) हे गुरुवारी (दि़१५) रात्रीच्या सुमारास बसने प्रवास करीत होते़ या प्रवासात चोरट्यांनी त्यांच्या बॅगमधील २९ हजार रुपयांची रोकड चोरून नेली़ या प्रकरणी मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
बसप्रवासात रोख रकमेची चोरी
By admin | Updated: October 21, 2015 21:58 IST