शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

औष्णिक केंद्राचा संच क्रमांक ५ प्रथम स्थानावर

By admin | Updated: January 17, 2016 22:30 IST

औष्णिक केंद्राचा संच क्रमांक ५ प्रथम स्थानावर

चाडेगाव : जुन्या वीजनिर्मिती संचांमधून वीजनिर्मिती करताना अनेक अडचणी निर्माण होत असल्या तरी त्यावर मात करून नाशिक औष्णिक वीज केंद्र देशात विसाव्या क्रमांकावर आहे. तर केंद्रातील संच क्रमांक ५ हा राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती संचलन निरीक्षण संघाच्या बैठकीत देण्यात आली.एकलहरा औष्णिक विद्युत केंद्रात ५१वी संचलन पुनर्निरीक्षण संघाची बैठक पार पडली. यावेळी वीजनिर्मितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चासत्रात नितीन गगे, अधीक्षक अभियंता यांना एकलहरा औष्णिक विद्युत केंद्राच्या कामगिरीचा आढावा सादर केला. एकलहरा औष्णिक विद्युत केंद्र ३५ वर्षे जुन्या संचातून वीजनिर्मिती करताना अनेकवेळा आलेल्या तत्कालिक कठीण प्रसंगावर मात करून देशात २०व्या क्रमांकावर आहे. तसेच वीजनिर्मिती केंद्रातील संच क्र. ५ हे राज्यात पहिल्या स्थानावर आहे. एप्रिल ते डिसेंबर २०१५ या काळात १७५.३६ कोटींचा नफा मिळवला आहे. भारांकात ७१.१० टक्के वरून ८७.९८ पर्यंत व वीजनिर्मितीत ३०८० दशलक्ष युनिट वरून ३३२४.८५ दशलक्ष युनिटपर्यंत वाढ झाली असूनही मागील वर्षीच्या तुलनेत इंधन तेल वापरात ३३ कोटींची बचत केली. तसेच वीजनिर्मिती जास्त करून कोळसा वापरात १३.८७ कोटी रुपयांची बचत केली आहे. याशिवाय संच संचलनाकरिता विजेचा वापर ५.७ टक्के कमी केल्यामुळे सुमारे २५.९८ कोटी रुपयांची बचत केली. तसेच फ्लाय अ‍ॅशचा वापर ९५ टक्क्यांपेक्षा जास्त असून, पाण्याचा पुनर्वापर ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे ही महानिर्मिती कंपनीत एकलहरे विद्युत केंद्राची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरत आहे. यावेळी दर महिन्याला विद्युत केंद्रात दिला जाणारा सर्वोत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार हा अंबादास नामदेव मुसळे यांना मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्या हस्ते देण्यात आला. बैठकीला महानिर्मितीचे संचलन संचालक, विजय सिंह, कार्यकारी संचालक कैलास चिरूटकर, एनटीपीएसचे परिंदा, उपमुख्य अभियंता प्रकाश खंडारे, गजेंद्र पुराणिक, अधीक्षक अभियंता व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. (वार्ताहर)