शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

नाशिकच्या तरुणाईने कलागुणांनी वेधले नरेंद्र मोदी यांची जिंकले मन

By अझहर शेख | Updated: January 12, 2024 17:06 IST

राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. १२) नाशिकमधील तपोवनात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले

नाशिक : गोंधळी, आदिवासी, भांगडा, गरबा अशा वेगवेगळ्या लोकनृत्यांचे दमदार सादरीकरण.. ढोलवादनाचा निनाद.. वारकरी विद्यार्थ्यांकडून होणारा टाळ-मृदंगाचा गजर.. शाळकरी मुलांचे लेझीम नृत्य.. शरीरसौष्ठवपटूंचे प्रदर्शन.. यशवंत व्यायामशाळेच्या मल्लखांबपटू शाळकरी मुला-मुलींनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांद्वारे नाशिकच्या तरुणाईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधून घेतले. फुलांनी सजविलेल्या खुल्या जीपमधून मोदी यांनी रोड-शो करत तरुणाईच्या सादरीकरणाला दाद दिली.

राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. १२) नाशिकमधील तपोवनात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने मोदी यांचा निलगिरी बाग हेलिपॅड ते साधुग्राम प्रवेशद्वार असा दोन किमीचा रोड-शो कडेकोट बंदोबस्तात सकाळी १०:३० ते ११ वाजेदरम्यान पार पडला. छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या एकतर्फा सर्व कलापथके, नागरिकांसाठी जागा आरक्षित होती. दुभाजकाच्या विरुद्ध बाजूने संपूर्ण मार्ग मोदी यांच्या कॅन्वॉयसाठी राखीव ठेवण्यात आला होता. त्या मार्गावर सुरक्षा व्यवस्थेमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नव्हता.

गोंधळी नृत्यपंचवटी येथील स्वामीनारायण इंग्लिश मीडियम स्कूलच्या १८ विद्यार्थिनींनी गोंधळी नृत्य सादर करत मने जिंकून घेतली. या मुलींनी दोन दिवस गोंधळी नृत्याचा कसून सराव करत रोड शोदरम्यान शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दमदार पारंपरिक नृत्याचे मराठमोळ्या वेशात सादरीकरण केले.

आदिवासी पारंपरिक नृत्यत्र्यंबकेश्वर येथील हेदुली पाडा येथील कोंबडनाच कलापथकाने पारंपरिक आदिवासी नृत्याचे सादरीकरण केले. पायात घुंगरू, हातात दांडीया घेत या कलापथकाने आदिवासी नृत्य सादर केले. तसेच, साक्री येथून आलेल्या आदिवासी कलापथकानेसुद्धा आपली कला सादर केली.

भांगडा, गरबा नृत्याने वाढविली रंगतस्वामी विवेकानंद स्कूल व सायक्लोन डान्स अकादमीच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत भांगडा नृत्याचे सादरीकरण केले. सुमारे २०पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या समूह लोकनृत्यामध्ये सहभाग घेतला. तसेच, शहरात वास्तव्यास असलेल्या कच्छ कडवा पाटीदार समाजाच्या १०० पेक्षा जास्त महिला, पुरुषांनी एकत्र येत पारंपरिक गरबा नृत्याचे सादरीकरण केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी