शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
2
BANW vs INDW : भारतीय महिलांनी रचला इतिहास; बांगलादेशला त्यांच्यात घरात ५-० ने नमवले
3
हरियाणातील BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने केला बहुमताचा दावा, राज्यपालांना लिहिले पत्र...
4
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
5
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
6
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
7
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
8
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
9
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
10
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
11
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
12
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?
13
चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार!
14
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
15
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
16
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका
17
राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम वेगाने सुरु; ‘असा’ असेल राम दरबार, कधी होणार पूर्ण?
18
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी
19
"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी
20
‘पैसे मिळाले नाहीत का तुला? मिळाले नसतील तर...’, भरसभेत अजित पवार यांनी विचारलं आणि...

पहिल्याच पावसात रस्त्याचा भराव गेला वाहून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2022 12:17 AM

पिळ्कोस : कळवण तालुक्यातील पिळकोससह परिसरात काल झालेल्या पहिल्या मुसळधार पावसाने राज्य महामार्ग क्र. १७ वरील गिरणा नदीवरील पिळकोस- बगडू पुलाच्या नुकतेच नवीन डांबरीकरण झालेल्या रस्त्याचा उत्तरेकडील बाजूचा रस्ता व पुलाचा भराव पावसाच्या पाण्याने वाहून गेला असून या ठिकाणी लहान मोठे अपघात होऊ लागले आहेत. संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाहनधारक प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देमहामार्ग क्र. १७ वर अपघातात वाढ

पिळ्कोस : कळवण तालुक्यातील पिळकोससह परिसरात काल झालेल्या पहिल्या मुसळधार पावसाने राज्य महामार्ग क्र. १७ वरील गिरणा नदीवरील पिळकोस- बगडू पुलाच्या नुकतेच नवीन डांबरीकरण झालेल्या रस्त्याचा उत्तरेकडील बाजूचा रस्ता व पुलाचा भराव पावसाच्या पाण्याने वाहून गेला असून या ठिकाणी लहान मोठे अपघात होऊ लागले आहेत. संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाहनधारक प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.भगदाड पडण्यास सुरुवातदीड वर्षापासून ह्या रस्त्यावर संबंधित ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला खोल साईटपट्ट्या कोरून ठेवल्या असून त्या भरल्या नसून,त्या ठिकाणी ही अपघात होत आहेत. शेतकऱ्यांच्या पाईप लाईन तोडल्या व त्या जोडून दिल्या नसल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे. या राज्य महामार्ग क्रमाक १७ च्या रस्त्यावरून पावसाचे पाणी नदीकडे प्रवाहित होत असल्यामुळे पुलाच्या समोरील उतारावरील रस्त्याच्या कडेचा भराव यात वाहून गेला आहे. त्याठिकाणी खोल भाग झाला असून पुलाच्या दोन्ही बाजूला भगदाड पडण्यास सुरुवात झाली आहे. संबंधित विभागाने कायमस्वरूपी टिकाऊ असा भराव करून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अशी मागणी वाहनधारकांकडून जोर धरत आहे.शेतकऱ्यांत असमाधानगेल्या आठवड्यात भादवण फाटा ते पिळकोस - बगडू पूल या एक किमी अंतरावर नवीन डांबरीकरण झाले. पहिल्या पावसात त्याचे पितळ उघडे झाल्याने मुसळधार पावसाचे पाणी याच दिशेने वाहून थेट गिरणा नदीवरील पिळकोस झ्रबगडू या पुलावर आले व त्यातच रस्ता खचला. पुलाच्या रस्त्याचा भराव वाहून गेला. संबंधित रस्त्याच्या कामाकडे संबंधित विभागाचे अधिकारी फिरकत नसून झालेल्या कामांची गुणवत्ता व दर्जा याबाबतीत लोकप्रतिनिधी व शेतकरी असमाधानी आहेत.सिमेंट गटारींची मागणीगिरणा नदीवरील पिळकोस झ्रबगडू पुलावर अपघात हे नियमित घडत असतात. संबंधित विभागाने या रस्त्याला कायमस्वरूपी टिकेल असा भराव भरून रस्ता वाहतुकीस योग्य करावा व पुलाच्या दोन्हीही बाजूच्या रस्त्याला पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी सिमेंटच्या गटारी कराव्यात, अशी मागणी उपसरपंच प्रवीण जाधव, योगेश जाधव,राहुल सूर्यवंशी, संदीप जाधव, पंडित जाधव, अशोक जाधव, शिवा जाधव, सुनील जाधव, रोशन जाधव, उत्तम मोरे, ललित वाघ यांसह परिसरातील नागरिकांनी व वाहनधारकांनी केली आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाtalukaतालुका