शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दरेवाडीतील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2022 00:30 IST

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत काळुस्ते येथील दरेवाडीतील महिलांच्या डोक्यावरील हंडा कायमचा उतरणार आहे. अठरा विश्व दारिद्र्य, रोजचे ...

ठळक मुद्देकाळुस्ते येथे स्वदेश फाउंडेशनकडून पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत काळुस्ते येथील दरेवाडीतील महिलांच्या डोक्यावरील हंडा कायमचा उतरणार आहे. अठरा विश्व दारिद्र्य, रोजचे जीवनमान हे मोलमजुरीवरच जगत आलेल्या व कायम कठीण परिश्रम हे नशिबात लिहून ठेवलेल्या अशा हलाखीच्या परिस्थितीत आपले जीवनमान जगत असलेल्या दरेवाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येत भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वदेश फाउंडेशन व गाव विकास समितीच्या उपस्थितीत दरेवाडीत नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.धारणांच्या तालुक्यात विविध खेडेगावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी उन्हा तान्हात पायपीट करत वण वण करत फिरावे लागते ही मोठी शोकांतिका आहे. धरण उशाला अन कोरड घशाला अशी परिस्थिती आदिवासी दुर्गम भागात बघावयास मिळते आहे. याच परिस्थितीला बदलविण्यासाठी स्वदेश फाउंडेशनने पुढे पाऊल टाकत ग्रामस्थांना एकत्र करत अखेर काळुस्ते येथील दरेवाडीतील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचा संकल्प केला आहे. दरेवाडीत स्वदेश फाउंडेशनकडून नुकतेच पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.यावेळी काळुस्ते गावचे लोकनियुक्त महिला सरपंच वनिता गवारी, ग्रामपंचायत सदस्य अनिरुद्ध घारे व दरेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक व महिला तसेच स्वदेश मित्र आनंद बाबा पुराणे, के. ए. ग्रुपचे अध्यक्ष संदीप गवारी, उपाध्यक्ष राजेंद्र घारे, गोरख घारे, प्रकाश घारे, दादू गावंडा, राजू भगत, देवराम गावंडा यांच्यासह अंगणवाडी सेविका, स्वदेश फाउंडेशनचे मार्गदर्शक गणेश थोरात व दरेवाडी येथील ग्रामस्थ, नागरिक तरुण, महिला आदी उपस्थित होते.