शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

समको बँकेची सूत्रे पुन्हा ह्यआदर्शह्णच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2022 23:13 IST

सटाणा : संपूर्ण बागलाण तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या येथील सटाणा मर्चंट्स बँकेच्या निवडणुकीत सभासदांनी अखेर आदर्श पॅनलवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला. सोमवारी (दि.२७) झालेल्या मतमोजणीत सत्ताधारी आदर्श पॅनलला १७ पैकी १५ जागांवर विजय मिळाला, तर त्यांनी विरोधी श्री सिद्धिविनायक पॅनलचा साफ धुव्वा उडवला. या पॅनलचे सर्वसाधारण गटातील उमेदवार डॉ. विठ्ठल येवलकर व भास्कर अमृतकर हे काठावर पास झाले.

ठळक मुद्देसत्ताधाऱ्यांवर विश्वास : १७ पैकी १५ जागांवर विजयविरोधी श्री सिद्धिविनायक पॅनलचा उडवला साफ धुव्वा

सटाणा : संपूर्ण बागलाण तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या येथील सटाणा मर्चंट्स बँकेच्या निवडणुकीत सभासदांनी अखेर आदर्श पॅनलवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला. सोमवारी (दि.२७) झालेल्या मतमोजणीत सत्ताधारी आदर्श पॅनलला १७ पैकी १५ जागांवर विजय मिळाला, तर त्यांनी विरोधी श्री सिद्धिविनायक पॅनलचा साफ धुव्वा उडवला. या पॅनलचे सर्वसाधारण गटातील उमेदवार डॉ. विठ्ठल येवलकर व भास्कर अमृतकर हे काठावर पास झाले.या निवडणूक निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. १९ जून रोजी मतदान झाल्यानंतर २० जून रोजी मतमोजणीवर श्री सिद्धिविनायक पॅनलने आक्षेप घेतल्याने मतमोजणी थांबवून बूथ क्रमांक ४/२ ची निवडणूक झाली. सोमवारी (दि.२७) निकाल जाहीर झाल्याबरोबर आदर्श पॅनलच्या समर्थक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत व फटाक्यांच्या आतषबाजीने जल्लोष केला.निवडून आलेले आदर्श पॅनलचे उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे - सर्वसाधारण गटात पंकज ततार (३६७८), जयवंत येवला (३५०२), कैलास येवला (३३८०), स्वप्नील बागड (३२९८), सचिन कोठावदे (३१२१), महेश देवरे (३०५५), अभिजित सोनवणे (२९४८), चंद्रकांत सोनवणे (२९१७), रमणलाल छाजेड (२८८१), प्रवीण बागड (२८५८), सिद्धिविनायक पॅनलमधील डॉ. विठ्ठल येवलकर (३२८७), भास्कर अमृतकर (२८५५) तसेच भटक्या विमुक्त जाती-जमाती गटात जगदीश मुंडावरे, इतर मागास वर्ग गटात दिलीप येवला (३३९१), अनुसूचित जाती-जमाती गटात प्रकाश सोनग्रा, महिला राखीव गटात रूपाली कोठावदे (३३४७), कल्पना येवला (३१५८) हे विजयी झाले.मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून देवळ्याचे सहायक निबंध सुजय पोटे यांनी काम पाहिले. जितेंद्र शेळके, शरद दराडे, अनिल पाटील, देवीदास बागडे यांनी त्यांना साहाय्य केले. पोलीस निरीक्षक सुभाष अनमूलवार यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.पंकज ततारांना सर्वाधिक मतेविजयी उमेदवारांमध्ये पंकज सुभाष ततार यांना सर्वाधिक मते मिळाली, तर आदर्श पॅनलचे उमेदवार अशोक गुळेचा यांचा अल्पमताने पराभव झाल्याने समर्थकांमध्ये नाराजीचा सूर होता. श्री सिद्धिविनायक पॅनलचे विजयी उमेदवार विठ्ठल येवलकर निवडून आले असले तरी त्यांनी तात्काळ राजीनामा देऊन पायउतार होण्यासाठी पॅनलच्या इतर पराभूत उमेदवारांकडून त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याची चर्चा होती.

टॅग्स :bankबँकElectionनिवडणूक