शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
3
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
4
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
5
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
6
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
7
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
8
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
9
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
10
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
11
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
12
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
13
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
14
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
15
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
16
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
17
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
18
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
19
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

श्रेयवाद पेटला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:57 IST

संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, नगराध्यक्ष सुनील मोरे, आजी-माजी आमदार चव्हाण दांपत्य यांच्यात श्रेयवाद पेटल्याने पुनंद पाणीपुरवठा योजना राजकीय संघर्षात अडकण्याची चिन्हे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : शहरासाठी संजीवनी ठरणारी केळझर पाणीपुरवठा योजना राजकीय संघर्षामुळे गुंडाळल्यानंतर आता पुनंद पाणीपुरवठा ही महत्त्वाकांक्षी योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असताना संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, नगराध्यक्ष सुनील मोरे, आजी-माजी आमदार चव्हाण दांपत्य यांच्यात पुन्हा एकदा श्रेयवाद पेटल्याने ही योजना राजकीय संघर्षात अडकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गुरुवारी नगराध्यक्ष सुनील मोरे आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी पुनंद योजनेसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यानंतर शुक्रवारी आमदार दीपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण या दांपत्याने येथील शासकीय विश्रामगृहात योजना कोणी प्रस्तावित केली याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली. आमच्या मातोश्री नगराध्यक्ष असताना दि. १९ सप्टेंबर २०१५ रोजी पुनंद पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी बहुमताने ठराव मंजूर केला. त्यानंतर दि. ७ जुलै २०१६ रोजी शासन स्तरावर या योजनेसाठी पुनंद प्रकल्पामधून २.३६५२ दशलक्ष घनमीटर पाणी  कायमस्वरूपी आरक्षित करून घेतले. या योजनेच्या सर्वेेक्षणसाठी दि. ११ सप्टेंबर २०१५ रोजी दहा लाख रुपयांची तरतूद करून सर्वेक्षण पूर्ण करून घेतले. या तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतरच आपण सादर केलेल्या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी मिळाली. या योजनेला अंतिम मंजुरी मिळविण्यासाठी दि. १७ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, नगरसेवक काका सोनवणे, माजी नगराध्यक्ष विजय वाघ, पांडुरंग सोनवणे, भरत खैरनार, झिप्रूअण्णा पाटील, ज. ल. पाटील, धर्मा पाटील, आनंद सोनवणे, जनार्दन सोनवणे, नामपूरच्या सरपंच रंजना मुथा, सोनाली निकम, अशोक सावंत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता वानखेडे, निखील गीते आदी उपस्थित होते.