शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कृतज्ञता हा जीवनातील महान गुण : सुरीश्वरजी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:33 IST

पाप रसिकता घटणे हेच उपधानचे खरे लक्ष्य असून, जीवनात महान गुण कृतज्ञता आहे. कृतज्ञता म्हणजे आपल्यावर केलेल्या उपकारांनी जाण ठेवणे होय, असे प्रतिपादन जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.

नाशिकरोड : पाप रसिकता घटणे हेच उपधानचे खरे लक्ष्य असून, जीवनात महान गुण कृतज्ञता आहे. कृतज्ञता म्हणजे आपल्यावर केलेल्या उपकारांनी जाण ठेवणे होय, असे प्रतिपादन जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.लॅमरोड बालगृहरोड येथील कालापूर्णम् धाममध्ये उपधान तपाच्या प्रवचनात बोलताना जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज म्हणाले की, केलेल्या उपकारांना विसरून जाणे म्हणजे कृतघ्नता हा सर्वांत मोठा दुर्गुण आहे. उपधान तपातील आराधकांना मी उत्तम कृतज्ञ मानत आहे. उपधान तप पूर्ण झाल्यानंतर साधकांची पाप रसिकता घटायला हवी व धर्म रसिकता वाढायला हवी. तसेच मोक्ष रसिकता हृदयात जन्मायला यावी. पापाच्या अशुचित आपण सर्व आतापर्यंत अडकलेलो होतो. मात्र आता उपधान तपाच्या स्नानकुंडात शुद्ध झाल्यानंतर पुन्हा अनाचाराने आत्मा मलीन न होण्यासाठीच तुम्हाला व्रत, नियम, बंधन यांची नियमावली दिलेली आहे. ही नियमावली तुमच्या आत्म्याच्या संरक्षणासाठी तिजोरी स्वरूप आहेत. ज्याप्रमाणे पैशाला तिजोरीत ठेवल्यानंतर आपण निश्चिंत होतो. तसेच तुमचे आत्मधन सुरक्षित ठेवायचे असेल तर उपधान तपाच्या नियमांची तिजोरी घेऊन जाणे आवश्यक आहे. तुम्ही सुखाचा आनंद स्वचित अनुभवला असेल, खाण्याचा आनंद अनुभवण्याची जी संधी लाभली आहे ती तुमच्या जीवनासाठी सुवर्णसंधी म्हणून सदा अविस्मरणीय होवो असे सांगत जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज यांनी शालिभद्रच्या कथेचा काही भाग सांगितला.दीक्षार्थी वरघोडा शोभायात्राउपधान तपातील मुंबई येथील महिला साधक मंजूलाबेन निमावत व सुरत येथील १३ वर्षांची मुलगी मोक्षाबेन शाह या दीक्षार्थींची वरघोडा शोभायात्रा शनिवारी सकाळी बेलतगव्हाणरोड कहाननगरपासून बालगृहरोड कलापूर्णम् तीर्थधामपर्यंत काढण्यात आली होती. दीक्षार्थी वरघोडा शोभायात्रेत गच्छाधिराज जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज यांच्यासह आचार्य, साधू-संत, साध्वी, साधक, जैन बांधव सहभागी झाले होते. सायंकाळी भजनसंध्या कार्यक्रम पार पडला. रविवारी सकाळी दीक्षा सोहळा समारंभ होणार आहे.

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरReligious programmeधार्मिक कार्यक्रम