शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधण्यासाठी थाळीनाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:29 IST

नाशिक : रस्ता कामांची प्रत्यक्ष पाहणी न करता न केलेल्या कामांसाठी जिल्हा परिषदेने ठेकेदारास ३० लाखांची देयके अदा केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी युवा सेनेच्या माध्यमातून थाळीनाद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देयुवा सेनेची कारवाई करण्याची मागणी : कामे न करताच देयके अदा झाल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप

नाशिक : रस्ता कामांची प्रत्यक्ष पाहणी न करता न केलेल्या कामांसाठी जिल्हा परिषदेने ठेकेदारास ३० लाखांची देयके अदा केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी युवा सेनेच्या माध्यमातून थाळीनाद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.त्र्यंबकरोडवरील गोल्फ क्लब मैदानावर युवा सेनेचे तालुकाप्रमुख मिथुन राऊत, संपतराव सकाळे, विनायक माळेकर, जिल्हा परिषदेच्या सदस्या रूपांजली माळेकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी थाळीनाद करण्यात आला. त्यानंतर उपोषणास सुरुवात झाली.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर ते बोरपाडा रस्ता सुधारणा करणे व बोरपाडा ते वरसविहीर रस्ता सुधारणा या दोन्ही कामांसाठी प्रत्येकी १५ लाख बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांनी देयके मंजूर केलेली आहेत. सदर काम प्रत्यक्ष साईटवर न करता सार्वजानिक बांधकाम विभागांचे झालेले काम दाखवून जिल्हा परिषदेने बिल अदा केले आहे. यात संबंधित ठेकेदारांनी शासनाची व जिल्हा परिषदेची फसवणूक केली आहे. सदर दोषी ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दोन गावांना जोडणाºया रस्त्याची कामे न करता थेट देयके अदा करणाºया दोषींवर कारवाई न केल्याने आक्रमक झालेल्या त्र्यंबक युवा सेना व विनायक माळेकर यांनी बेमुदत थाळीनाद आंदोलन केले. कारवाई झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका माळेकर यांनी घेतली आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नेरश गिते यांना निवेदनही देण्यात आले आहे. यापूर्वीच माळेकर यांनी डॉ. गिते यांना पत्र दिलेले आहे. मात्र, प्रशासनाकडून केवळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. याव्यातिरिक्त कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे माळेकर यांनी सांगितले. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्याकडे तक्र ार केली होती. मात्र, कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने, तालुक्यातील ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले असल्याचे मिथुन राऊत यांनी सांगितले. आंदोलनात प्रवीण तुंगार, परशराम मोंढे, अंबादास बेंडकोळी, अजित सकाळे, निसर्गराज सोनवणे, अंबादास बोरसे, जगन पिंपळके, विलास चौधरी, पोपट बेंडकोळी, विठ्ठल पवार, प्रदीप माळेकर, धोंडीराम डगळे, अशोक लांघे, विष्णू बेंडकोळी, योगेश आहेर आदी सहभागी झाले होते. कामे पूर्णत्वाचा पुरावा द्याज्या रस्त्यासाठी देयक अदा करण्यात आले आहे त्यासाठीची जी कार्यवाही करण्यात आली त्यामध्ये पाहणी रिपोर्ट, पूर्णत्वाचा दाखला, रस्त्याचे छायाचित्र याची माहिती माळेकर यांनी जिल्हा परिषदेकडे मागितली आहे. देयके कोणत्या आधारे देण्यात आली याचे सक्षम कारण सादर करावे, अशी ठाम मागणी माळेकर यांनी लावून धरली आहे.