शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

थॅलेसेमियाग्रस्त मुलांचा गौरव

By admin | Updated: May 10, 2017 00:38 IST

नाशिक : अर्पण थॅलेसेमिया सोसायटीच्या वतीने पाचव्या वर्धापनदिनी थॅलेसेमिया पीडित मुलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : थॅलेसेमिया पीडित रुग्णांना मोफत रक्तसंक्रमणाची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या अर्पण थॅलेसेमिया सोसायटीच्या वतीने पाचव्या वर्धापनदिनी थॅलेसेमिया पीडित मुलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘थॅलेसेमिया डे’ निमित्त शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पीडित मुलांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. थॅलेसेमिया पीडित रुग्णांना मोठ्या प्रमाणावर रक्तसंक्रमणाची गरज भासते. मात्र, ऐन उन्हाळ्यात रक्ताची टंचाई भासत असल्याने अर्पण रक्तपेढी आणि इनरव्हील क्लब आॅफ जनरेशन नेक्स्ट यांच्या वतीने ‘समर चॅलेंज-२०१७’चे आयोजन सिटी सेंटर मॉलमध्ये करण्यात आले आहे. त्यानिमित्त ‘थॅलेसेमिया डे’ साजरा करण्यात येऊन मुलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी थॅलेसेमिया आजाराविषयी जागृती करणारा लघुपट दाखविण्यात आला. तसेच पीडित मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले. प्रमुख अतिथींना थॅलेसेमिया पीडित मुलांनी बनविलेले दिवे व थॅँक्स कार्ड भेट म्हणून देण्यात आले. आजाराशी सामना करत शैक्षणिक क्षेत्रात नैपुण्य मिळविणाऱ्या मुलांचा गौरव करण्यात आला.  पालक व मुलांनी ‘उंच भरारी उज्ज्वलतेची’ ही नाटिका सादर केली. डॉ. पलोड यांनी थॅलेसेमिया मुलांची मोफत दंतचिकित्सेची जबाबदारी घेतली. वर्षा उगावकर यांनी थॅलेसेमिया सोसायटीची माहिती दिली. यावेळी झालेल्या शिबिरात १०० रक्तपिशव्या संकलित झाल्या.  सूत्रसंचालन भाग्यश्री पवार यांनी केले. यावेळी ब्रह्मा व्हॅलीचे सी. के. पाटील, स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या सुजाता कायदे, इनरव्हील क्लबच्या डॉ. मीनल पलोड, नंदिनी रामचंद्रानी, रोटरीच्या सौ. वेणूगोपाल यांच्यासह डॉ. शशिकांत पाटील, डॉ. स्नेहल पाटील आदि उपस्थित होते.