शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

थेट सरपंच निवडीचे मतदारांकडून स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:12 IST

नीलेश नहिरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदाभाडी : ग्रामपालिकेच्या निवडणुकांमध्ये येत्या काळात सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्यात यावी या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, त्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या निर्णयाचे सामान्य नागरिक व कार्यकर्त्याकडून स्वागत करण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सरपंच सदस्यांमधून निवडला जात असे मात्र यापुढील काळात सरपंच ...

नीलेश नहिरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदाभाडी : ग्रामपालिकेच्या निवडणुकांमध्ये येत्या काळात सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्यात यावी या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, त्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या निर्णयाचे सामान्य नागरिक व कार्यकर्त्याकडून स्वागत करण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सरपंच सदस्यांमधून निवडला जात असे मात्र यापुढील काळात सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून, माहे सप्टेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाºया ग्रामपंचायतींना निर्णय लागू असल्याचे जाहीर करण्यात आले आहे, तसेच याबाबत नागरिकांच्या सूचना लक्षात घेण्यासाठी १९ जुलै रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जुन्या सरपंच निवडपद्धतीत सदस्यांचे बहुमत सिद्ध करावे लागत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोडेबाजार होत होता, तसेच घराणेशाहीमुळे सामान्य नागरिक व कार्यकर्त्यांना पदापासून वंचित राहावे लागत होते; मात्र थेट सरपंच निवडीने सामान्य कार्यकर्त्यांच्या आशा उंचावल्या आहेत. सामान्य नागरिकांच्या मतांचे महत्त्व वाढणार असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात असून, या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. थेट सरपंच निवडीत निवडलेल्या सरपंचावर निवडीनंतर दोन वर्षापर्यंत व पाच वर्षे कार्यकाळ संपण्याच्या सहा महिने अगोदर कोणताही अविश्वास ठराव मांडला येणार नाही व त्याचप्रमाणे सरपंचाचे अधिकार ही वाढविण्यात आले आहेत. सरपंचाला आर्थिक वार्षिक आराखडा बनविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत झालेल्या थेट नगराध्यक्ष निवडीच्या निर्णयानंतर हा निर्णय झाल्याने पुढील काळात कशी प्रक्रि या राबवली जाईल याबाबत गावागावातील चौकांमध्ये गप्पा रंगत आहेत.तरुण मतदारांकडून स्वागतमालेगाव तालुक्यातील आॅक्टोबर महिन्यात मुदत संपणाºया दाभाडी, सौंदाणेसह इतर ग्रामपंचायतींनाही थेट सरपंच निवड लागू असणार आहे. यामुळे पहिल्यांदाच हा अनुभव गावातील मतदारांना मिळणार असल्याने वेगवेगळ्या कुतुहलाच्या प्रतिक्रि या पहावयास मिळत आहेत. या निर्णयाचे तरु ण मतदारांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत केले जात आहे. जुन्या सरपंच निवडपद्धतीत सदस्यांचे बहुमत सिद्ध करावे लागत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोडेबाजार होत होता, तसेच घराणेशाहीमुळे सामान्य नागरिक व कार्यकर्त्यांना पदापासून वंचित राहावे लागत होते; मात्र थेट सरपंच निवडीने सामान्य कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.