शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

देवळ्यात ग्राहक दिनाच्या बैठकीकडे अधिकाऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 01:09 IST

ग्राहक संरक्षण कायद्याविषयी ग्राहकांना फारशी माहिती नसल्याने फसवणूक झाल्यावर काय करावे? याबाबत असलेल्या अज्ञानामुळे तक्रार करण्यास ग्राहक पुढे येत नाही. ग्राहकांना उत्पादन व बाजारपेठेबाबत साक्षरता यावी यासाठी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी ग्राहक संरक्षण कायद्यासंबंधी माहिती देणारा फलक लावण्यात येईल, असे प्रतिपादन तहसीलदार कैलास पवार यांनी केले. देवळा येथे जागतिक ग्राहक दिनानिमित्त झालेल्या बैठकीत ते बोलत होते. वीज वितरण कंपनी, तालुका कृषी कार्यालय, वैध मापन आदी ग्राहकांशी सर्वाधिक संबंध येणाºया कार्यालयांसह इतर शासकीय कार्यालयांतील एकही अधिकारी वा कर्मचारी ग्राहक दिनास उपस्थित नव्हता.

देवळा : ग्राहक संरक्षण कायद्याविषयी ग्राहकांना फारशी माहिती नसल्याने फसवणूक झाल्यावर काय करावे? याबाबत असलेल्या अज्ञानामुळे तक्रार करण्यास ग्राहक पुढे येत नाही. ग्राहकांना उत्पादन व बाजारपेठेबाबत साक्षरता यावी यासाठी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी ग्राहक संरक्षण कायद्यासंबंधी माहिती देणारा फलक लावण्यात येईल, असे प्रतिपादन तहसीलदार कैलास पवार यांनी केले.देवळा येथे जागतिक ग्राहक दिनानिमित्त झालेल्या बैठकीत ते बोलत होते. वीज वितरण कंपनी, तालुका कृषी कार्यालय, वैध मापन आदी ग्राहकांशी सर्वाधिक संबंध येणाºया कार्यालयांसह इतर शासकीय कार्यालयांतील एकही अधिकारी वा कर्मचारी ग्राहक दिनास उपस्थित नव्हता. ग्राहकांप्रती असलेली शासकीय अधिकाºयांची अनास्था यातून प्रकट झाली. येथील नवीन प्रशासकीय कार्यालयात तहसीलदार कैलास पवार यांच्या उपस्थितीत जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी देवळा तालुका ग्राहक पंचायतीचे संघटक संजय मांडगे, सहसंघटक संजय देवरे, निंबाजी अहेर, हेमंत जोशी, सनी परदेशी, मोबीन तांबोळी, बाबा पवार, राजपाल अहीरे, संजय भदाणे, शशिकांत चितळे आदि ग्राहक मंचचे सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक संजय देवरे यांनी केले. यावेळी गॅस एजन्सी, बँक, मुद्रांक विके्रते, खते व बी-बियाणे विक्र ेते यांच्याकडून ग्राहकांची होणारी अडवणूक व फसवणुकीबाबत चर्चा करण्यात आली. गॅस एजन्सीकडून घरपोच सिलिंडर सेवा देण्याच्या नावाखाली ग्राहकांच्या होणाºया फसवणुकीबाबत एजन्सीच्या कर्मचाºयांशी चर्चा करण्यात आली. गॅस एजन्सीपासून २० कि.मी. अंतराच्या आतील ग्राहकांना नियमानुसार आजच्या दरानुसार सिलिंडर ६९८ रुपये दराने द्यावे, ग्राहकांंकडून घरपोहोच सेवा देण्याच्या नावाखाली अतिरिक्त २० ते ३० रूपये घेतले जातात ते घेउ नये, तशा माहितीचे दर पत्रक एजन्सीने दर्शनी भागात लावावेत, अशी सूचना तहसीलदार पवार यांनी केली. ग्राहकांचे हित जपण्यासाठी शासनस्तरावरून योग्य ते सहकार्य केले जाईल, असेही आश्वासन तहसीलदारांनी यावेळी दिले. ग्राहक दिनास अनुपस्थित असलेल्या विभागांंचा आढावा त्यांनी घेतला. बैठकीला पुरवठा विभागाचे कर्मचारी, स्वस्त धान्य दुकानदार, रॉकेल विक्र ेते, आदी उपस्थित होते.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय