शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या गुणवत्ता यादीसाठी कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 01:04 IST

महापालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील २७ हजारांहून अधिक जागांसाठी सुमारे २८ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रवेशासाठीच्या उपलब्ध जागांच्या तुलनेत विज्ञान व वाणिज्य शाखांसाठी सर्वाधिक विद्यार्थ्यांचे अर्ज असल्याने यंदा गुणवत्ता यादीत जागा मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची कसोटी लागणार आहे.

नाशिक : महापालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील २७ हजारांहून अधिक जागांसाठी सुमारे २८ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रवेशासाठीच्या उपलब्ध जागांच्या तुलनेत विज्ञान व वाणिज्य शाखांसाठी सर्वाधिक विद्यार्थ्यांचे अर्ज असल्याने यंदा गुणवत्ता यादीत जागा मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची कसोटी लागणार आहे. यावर्षी दहावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्याही सर्वाधिक आहे. त्यामुळे पहिल्या गुणवत्ता यादीत विज्ञान शाखेसाठी ९४ ते ९५ टक्क्यांपर्यंत तर वाणिज्य शाखेसाठी ९० टक्क्यांच्या पुढे राहण्याच्या अंदाज व्यक्त केला जात असून, नामांकित महाविद्यालयांमध्ये कला शाखेची जागा मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची कसोटी लागणार असल्याने विद्यार्थ्यांचे लक्ष गुणवत्ता यादीकडे लागले असून, प्रवेशासाठी मोठी कसरत करावी लागू शकते. शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रि या होत असून, पहिल्या गुणवत्ता यादीसाठी २७ हजार ९१६ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज दाखल झाले. त्यात विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक अर्ज आले असून अकरावी प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी ५ जुलैला जाहीर होणार आहे.सर्वसाधारण गुणवत्ता यादीवर २० हरकतीशहरात अकरावीच्या विज्ञान, वाणिज्य, कला व संयुक्त शाखा यांची ५७ कनिष्ठ महाविद्यालये असून, त्यात प्रवेशाच्या २७ हजार ९०० जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी एकूण २३ हजार ८८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचे भाग एक व भाग दोन भरले असून, यात एसएससी बोर्डाचे २२ हजार ४३९, सीबीएसई बोर्डाचे ७५२, आयसीएसई ६२८ तर अन्य बोर्डाचे ६५ विद्यार्थी समाविष्ट आहेत. त्यापैकी कला शाखेसाठी ३ हजार ५४९, वाणिज्यला ९ हजार १२८, विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक १० हजार ६१४ व एमसीव्हीसीसाठी २८ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज प्राप्त झाले असून, यातील २० विद्यार्थ्यांनी २९ जूनला प्रसिद्ध झालेल्या गुणवत्ता यादीवर आक्षेप नोंदवला आहे. त्यांच्या हरकतींवर मंगळवारी (दि.३) निर्णय होणार आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालय