इंदिरानगर : सराईत गुन्हेगारांचा समावेश असलेली व दरोड्याच्या तयारीतील टोळीस इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने रविवारी पहाटे पाठलाग करून पकडले़ पोलिसांनी या टोळीकडून दरोड्यासाठीचे साहित्यही जप्त केले आहे़ या संशयितांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली़इंदिरानगर परिसरातील ज्ञानेश्वरनगरमध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक गस्त घालीत होते़ त्यावेळी रिक्षामध्ये (एमएच १५ झेड ८३८९) पाच जण संशयास्पदरीत्या बसल्याचे आढळून आले़ रिक्षाचालकास चौकशीसाठी थांबण्यास सांगितले असता त्याने सराफनगरकडून वडाळा-पाथर्डी रस्त्याने वेगाने रिक्षा पळवली़ पोलिसांनी लगेचच गस्तीवरील इतर पथकाला संदेश दिल्यानंतर ही रिक्षा सावरकर चौकात अडविण्यात आली़ रिक्षामध्ये बसलेले संशयित समीर अब्दुल रहेमान (४२, रा़ नानावली), सादीक इस्माईल शाह (२३, रा़ द्वारका), वसीम निसार शेख (२३, रा़ भारतननगर), गुलाम अलीबक्ष अन्सारी (२५, रा़ जुने नाशिक), वसीम अब्दुल शेख (२३, रा़ भारतनगर) यांची चौकशी करून झडती घेतली असता त्यांच्याकडे लोखंडी रॉड, दोरी, कटर, कटवणी हे दरोड्याचे साहित्य आढळून आले़ इंदिरानगर पोलिसांनी या पाचही संशयितांना अटक केली असून, त्यांच्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, यातील तिघे सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे़
इंदिरानगरला दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद
By admin | Updated: January 31, 2016 23:45 IST