शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

टॅँकरग्रस्त गावांची प्रांतांकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:43 IST

जिल्ह्णात गेल्या दोन महिन्यांत सरासरी ओलांडणारा विक्रमी पाऊस होऊनही पाच तालुक्यांतील जनतेची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती सुरूच असून, शासनाच्या आदेशान्वये ३१ जुलै रोजी जिल्हा प्रशासनाने या पाच तालुक्यांतील पिण्याच्या पाण्याचे टॅँकर बंद केले असले तरी, ऐन पावसाळ्यात भेडसविणाºया पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुन्हा टॅँकर सुरू करण्याशिवाय पर्यायच शिल्लक नसल्याने ज्या गावांना टंचाई भासत आहे अशा गावांची चौकशी करण्याच्या सूचना प्रांत व तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्णात गेल्या दोन महिन्यांत सरासरी ओलांडणारा विक्रमी पाऊस होऊनही पाच तालुक्यांतील जनतेची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती सुरूच असून, शासनाच्या आदेशान्वये ३१ जुलै रोजी जिल्हा प्रशासनाने या पाच तालुक्यांतील पिण्याच्या पाण्याचे टॅँकर बंद केले असले तरी, ऐन पावसाळ्यात भेडसविणाºया पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुन्हा टॅँकर सुरू करण्याशिवाय पर्यायच शिल्लक नसल्याने ज्या गावांना टंचाई भासत आहे अशा गावांची चौकशी करण्याच्या सूचना प्रांत व तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत.नाशिक जिल्ह्णात यंदा पहिल्यांदाच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून पूर्व पावसाचे आगमन झाले व त्यानंतर लगेचच मान्सून दाखल झाला. साधारणत: जून महिन्यात पावसाने आपला मुक्काम ठोकल्याने नद्या, नाले पुन्हा वाहू लागले. संपूर्ण महिन्यात सरासरीपेक्षा ११३ टक्के इतका पाऊस झाला, तर जुलै महिन्यातही पावसाचा जोर कायम राहिल्याने १४७ टक्के विक्रमी पाऊस नोंदविला गेला. जून व जुलै महिन्यात नाशिक जिल्ह्णात झालेल्या पावसामुळे जिल्ह्णातील धरणसाठ्यात ७३ टक्के इतकी वाढ झाल्याने पाणीप्रश्न सुटल्याचे चित्र निर्माण झालेले असताना प्रत्यक्षात मात्र बागलाण, मालेगाव, नांदगाव, सिन्नर व येवला या पाच तालुक्यांमध्ये सरासरीच्या ५० टक्केइतकाच पाऊस झाला आहे, त्यातही काही विशिष्ट भागातच पाऊस झाल्यामुळे या तालुक्यातील अन्य भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.जिल्ह्णात एकीकडे समाधानकार पाऊस पडत असताना दुसरीकडे पाच तालुक्यातील गाव, वाड्यांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असताना या टॅँकरला ३० जून नंतर जिल्हाधिकाºयांनी एका महिन्याची (दि. ३१ जुलैपर्यंत) मुदतवाढ दिली. या काळात ४३ गावे, २३ वाड्या अशा एकूण ६६ गावांना २६ टॅँकरच्या ९५ फेºयांद्वारे पाणीपुरवठा केला जात होता; मात्र ३१ जुलै रोजी टॅँकरची मुदतवाढ संपुष्टात आल्याने पुन्हा टॅँकर बंद करण्याची वेळ आली. तथापि, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेल्या गावांना टॅँकर सुरू ठेवा, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. त्यामुळे प्रशासनाने ज्या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे, अशा गावांमध्ये खरोखरच टॅँकरची गरज आहे काय, हे तपासून पाहण्याच्या सूचना प्रांत तसेच तहसीलदारांना दिल्या आहेत. त्यांच्या अहवालानंतरच टंचाईग्रस्त गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.