शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

उमराणे येथे तिव्र पाणीटंचाई ;प्रशासनाकडुन तुटपुंजा पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 18:57 IST

उमराणे : येथे व परिसरातील वाड्यावस्यांवर पाणीटंचाईने उग्र रु प धारण केले असुन येथील एकलव्य आदिवासी वस्तीत तर एका जलकुंभावर तब्बल दोनशे ते तिनशे हंडे पाणी भरण्यासाठी रांगेत असल्याचे भयानक चित्र समोर आले आहे.

ठळक मुद्देउमराणे : पाणीटॅकर वाढविण्याची मागणी ; महिलांची कसरत

उमराणे : येथे व परिसरातील वाड्यावस्यांवर पाणीटंचाईने उग्र रु प धारण केले असुन येथील एकलव्य आदिवासी वस्तीत तर एका जलकुंभावर तब्बल दोनशे ते तिनशे हंडे पाणी भरण्यासाठी रांगेत असल्याचे भयानक चित्र समोर आले आहे.उमराणे गाव व परिसरातील वाड्यावस्त्यांसाठी पाणीपुरवठा करणार्या परसुल धरणातील पाणी गेल्या एक मिहन्यापासून आटल्याने गावासह परिसरातील वाड्या वस्त्यांवर होणारा पाणीपुरवठा पुर्णत: विस्कळीत झाला आहे. सद्यस्थितीत गावासाठी परसुल धरणातील मृत साठ्यातील साठवणुक केलेले तसेच प्रशासनाकडुन रामेश्वर धरणातुन व महालपाटणे येथील अधिग्रहित केलेल्या विहिरीतुन तिन ट्करद्वारे तब्बल दहा ते बारा दिवसांआड पाणीपुरवठा होत असतानाच मात्र वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा करणे ग्रामपंचायतीला जिकरीचे बनले आहे. त्यामुळे यावास्तव चित्र निर्माण झाले आहे.शिवाय वाड्यावस्त्यांवरील कुपनलीका बंद पडल्या असुन पेयजल योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या जलकुंभातील पाणी आटल्याने तेथील परिस्थीतीत भयानक झाली आहे. प्रशासनाने येथील पाणीटंचाई दुर करण्यासाठी टॅकरची संख्या वाढवुन पाणीपुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थांसह महिलांनी केली आहे. @ येथील एकलव्य आदिवासी वस्तीत एक जलकुंभ असुन बोअरवेल्सद्वारे दर दोन तासांनी या जलकुंभात अवघे दहा ते बारा हंडे पाणी उपलब्ध होते. पाण्यासाठी रांगेत लावलेला नंबर दुसर्या किंवा तिसर्या दिवशी लागत असल्याने महिलांना कामधंदा सोडून पाणी मिळविण्यासाठी वेळ द्यावा लागत असल्याचे तेथील महिलांनी बोलुन दाखिवले.@ फोटो ओळ - उमराणे येथील एकलव्य आदिवासी वस्तीत जलकुंभातुन पाणी मिळविण्यासाठी रांगेत लावलेले हंडे.@ प्रतिक्रि या - सद्यस्थितीत उमराणे व परिसरातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.प्रशासनाकडुन तिन टॅकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु हा पाणीपुरवठा मागणी पेक्षा कमी होत असल्याने वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सदर वाड्यावस्त्यांवर ग्रामपंचायतीच्या मालकीचे टॅक्ट्ररवरील टॅकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात येईल.- लताबाई देवरे सरपंच, उमराणे.