शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिलमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:25 IST

नाशिक : दरवर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यात होणारी दहावी, बारावीची परीक्षा यंदा एप्रिल महिन्यात होणार आहे. या संदर्भातील संभाव्य वेळापत्रक ...

नाशिक : दरवर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यात होणारी दहावी, बारावीची परीक्षा यंदा एप्रिल महिन्यात होणार आहे. या संदर्भातील संभाव्य वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार बारावीची परीक्षा २३, तर दहावीची परीक्षा २९ एप्रिलपासून सुरू होणार आहे. दरम्यान, शाळा, महाविद्यालयांना पाठविण्यात येणारे छापील वेळापत्रकच अंतिम असेल अशी माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली.

कोविड-१९ विषाणूच्या पार्श्वभूमीवर उद‌्भवलेल्या परिस्थितीमुळे मंडळाच्या प्रचलित कालावधीमध्ये परीक्षा आयोजित न करता शासन मान्यतेने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी, बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार इयत्ता बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत, तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत होणार आहे. दरवर्षी या परीक्षा फेब्रुवारी मार्च या कालावधीत घेतल्या जातात.

दहावी-बारावीचे वर्ग सुरू झाले असून, त्यांना परीक्षेसाठीचा वेळ, तसेच त्यांच्या मनावरील ताण कमी व्हावा यासाठी एप्रिल महिन्यात परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक हे स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा, महाविद्यालयांना पाठविले जाणार आहे. संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले असले तरी या संदर्भातील कुणाच्या काही हरकती असतील तर त्यांना येत्या २२ तारखेपर्यंत लेखी स्वरुपात विभागीय मंडळांकडे कळविता येणार आहे.

--इन्फो--

व्हायरल वेळापत्रकापासून ग्राह्य नाही

मंडळाच्या संकेतस्थळावर संभाव्य वेळापत्रक देण्यात आलेले आहे. मात्र, ही सुविधा ही फक्त माहितीसाठी असून, परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक हेच अंतिम असेल असे राज्य मंडळाने कळविले आहे. या छापील वेळापत्रकानुसारच विद्यार्थांनी परीक्षेसाठी प्रविष्ट व्हावे, अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणांनी छापाई केलेले, व्हॉटसॲपवर व्हायरल झालेल्या वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य परीक्षा मंडळाकडून करण्यात आलेले आहे.