शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून दहावीची परीक्षा

By admin | Updated: March 7, 2017 01:23 IST

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणारी दहावीची परीक्षा मंगळवारपासून (दि.७) सुरू होत आहे.

 नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणारी दहावीची परीक्षा मंगळवारपासून (दि.७) सुरू होत आहे. नाशिक जिल्ह्यातील ९६ हजार ७३० विद्यार्थ्यांसह विभागातील एकूण दोन लाख १२ हजार ५७६ विद्यार्थी ४१७ केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी शिक्षण मंडळाची २८ भरारी पथके परीक्षेवर नजर ठेवणार आहे.दहावीच्या परीक्षेचा आज पहिला दिवस असून, नाशिक जिल्ह्यातील एकूण ९६ हजार ७३० विद्यार्थ्यांसाठी १८८ परीक्षा केंद्र असून, धुळे जिल्ह्णातील २९ हजार ९५० विद्यार्थ्यांना ६३ परीक्षा केंद्रांमध्ये पेपर द्यावे लागतील. जळगावमधून ६४ हजार ४८७ विद्यार्थ्यांसाठी १२७ परीक्षा केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे. तर नंदुरबारमध्ये ४० परीक्षा केंद्रांवर २१ हजार ४०९ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. याप्रमाणे एकूण २ लाख १२ हजार ५७६ विद्यार्थी परीक्षेच्या पहिल्या दिवशी मंगळवारी मराठी भाषेचा पहिला पेपर देणार आहेत. या चारही जिल्ह्णांमध्ये परीक्षेवर नजर ठेवण्यासाठी शिक्षण मंडळाने एकूण २८ भरारी पथके नेमली आहेत. यातील नऊ भरारी पथके नाशिक जिल्ह्णातील विविध परीक्षा केंद्रांवर नजर ठेवून असतील. धुळे येथे ६, जळगावमध्ये ५, नंदुरबारमध्ये ४, विभागीय स्तरावर ४ अशी भरारी पथकांची नेमणूक आहे. तर संपूर्ण विभागात ५८ परीक्षक असणार आहेत. दरम्यान, परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या आसन व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले असून, परीक्षा केंद्राच्या आवारात दर्शनी भागात विद्यार्थ्यांना त्यांचा आसन क्रमांक पाहता येणार आहे. काही विद्यार्थ्यांनी सोमवारी सायंकाळीच त्यांचा आसन क्रमांक आणि वर्ग क्रमांक पाहून खात्री करून घेतली आहे. ज्या विद्यार्थ्यांना आसन क्रमांक पाहता आला नाही त्यांनी परीक्षा केंद्रावर काही वेळ अगोदर पोहचून त्यांचा आसन क्रमांक निश्चित करून घेणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)