शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

वैनतेयच्या विद्यार्थ्यांना मिळाले तणावमुक्तीचे धडे

By admin | Updated: August 13, 2014 00:45 IST

वैनतेयच्या विद्यार्थ्यांना मिळाले तणावमुक्तीचे धडे

 

निफाड : येथील वैनतेय विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वैनतेय विद्यालय व ज्यु. कॉलेजमध्ये समुपदेशन विभागाच्या वतीने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘तणावमुक्त अभ्यासाचे नियोजन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. नाशिक येथील क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आदिती जोशी यांनी विद्यार्थी व पालक यांनी घ्यावयाची काळजी या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष प्रल्हाद पाटील-कराड अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे विश्वस्त वि. दा. व्यवहारे, रतन पाटील वडघुले, अ‍ॅड. दिलीप वाद्यावकन, किरण कापसे, भालचंद्र मोगल, प्राचार्य के. के. निकम आदि मान्यवर उपस्थित होते. मार्गदर्शन करताना जोशी यांनी सांगितले की, दहावी, बारावीचे वर्ष महत्त्वाचे आहे. हे विद्यार्थीदशेतच मुलांच्या मनावर पालक आणि शिक्षक बिंबवत असतात. त्यामुळे मुले या वर्षांमध्ये एका वेगळ्या चिंतेत वावरू लागतात. वास्तविक सर्वच इयत्ता महत्त्वाच्या असतात. त्यामुळे टेंशन न घेता अभ्यास करा, यश तुमचेच असेल, असेही जोशी यांनी सांगितले. मान्यवर पाहुण्यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. (वार्ताहर)बियाणे कंपनीवर कारवाईची मागणीकनाशी : बोगस सोयाबीनच्या बियाण्यांमध्ये तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला असून, सदरील कंपनीच्या बियाण्यांची चौकशी करून परवाने रद्द करण्याची मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे. कनाशी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी नामांकित कंपनीच्या सोयाबीन बियाण्याची पेरणी केली. बरेच दिवस उलटले तरी अनेक ठिकाणी सोयाबीनची बिजे पूर्णपणे अंकुरलीच नाहीत. त्यामुळे त्या सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची संकट आले असून, बियाणे खरेदी करण्यासाठी पैसे आणावे कोठून आणि बियाणे खरेदी करावे तरी कोणते असा प्रश्न त्यांना सतावतो आहे.चालू वर्षाच्या हंगामाकरिता सोयाबीन बियाणांची टंचाई निर्माण झाली. सोयाबीनचे पीक अल्पकालावधीतील आहे. त्यामुळे सोयाबीन निघाल्यावर दुसरे पीक घेता येत असल्याने शेतकरी सोयाबीनला पसंती देतात. ज्या कृषी केंद्रातून सोयाबीन बियाणे घेतले ते उगवण क्षमतेत अयशस्वी झाले. असे बियाणे परत घेण्यास कृषी केंद्र संचालक नकार देतात व पक्के बिलाची पावती न दिल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. तरी सदरील कंपनीच्या बियाण्यांची चौकशी होऊन परवाने रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.