शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

अंदाजपत्रकातील 250 कोटी रुपयांच्या काढल्या निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 01:16 IST

महापालिकेत भांडवली कामांसाठी कर्ज काढण्यावरून घमासान सुरू असतानाच प्रशासनाने मात्र कोणतेही दोषाराेपाचा विचार न करता अंदाजपत्रकात दर्शविलेल्या अडीचशे केाटी रुपयांच्या कामांच्या निविदा काढल्या असून, त्यामुळे आता प्रलंबित कामांमुळे नाराज नगरसेवकांची बरीच कामे पूर्ण होणार आहेत. अर्थात, ही कामांच्या निविदा आत्ताशी निघाल्याने पुढील आर्थिक वर्षात देयके द्यावी लागणार असल्यानेच आता ही कामे करण्याची तयारी सुरू करण्यात  आली आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीच्या तोंडावर : कर्ज काढण्यास मात्र प्रशासनाचा नकार कायम

नाशिक : महापालिकेत भांडवली कामांसाठी कर्ज काढण्यावरून घमासान सुरू असतानाच प्रशासनाने मात्र कोणतेही दोषाराेपाचा विचार न करता अंदाजपत्रकात दर्शविलेल्या अडीचशे केाटी रुपयांच्या कामांच्या निविदा काढल्या असून, त्यामुळे आता प्रलंबित कामांमुळे नाराज नगरसेवकांची बरीच कामे पूर्ण होणार आहेत. अर्थात, ही कामांच्या निविदा आत्ताशी निघाल्याने पुढील आर्थिक वर्षात देयके द्यावी लागणार असल्यानेच आता ही कामे करण्याची तयारी सुरू करण्यात  आली आहे. दरम्यान, सत्तारूढ भाजपच्या मागणीनुसार ३०० कोटी रुपयांचे कर्ज काढण्यास मात्र प्रशासनाचा नकारच कायम आहे. महापालिकेच्या सध्याच्या पंचवार्षिक कारकिर्दीचे हे अखेरचे वर्ष असून, पुढील वर्षी मात्र सर्वच पक्षांना निवडणुकींना सामेारे जावे लागणार आहे. गेले वर्ष कोरोनाच्या संकटात गेल्याने आता मात्र विकासकामांची लगीन घाई सुरू झाली आहे. किमान कामे मंजूर झाली तरी त्याचे नारळ फोडण्याचे काम आपल्याच कारकिर्दीत व्हावे यासाठी नगरेसवकांची लगबग सुरू आहे. सत्तारूढ भाजपने तर मागील ठरावात ३१ प्रभागांतील नागरी कामे विशेषत: रस्त्यांच्या कामे करण्याचा ठराव केला असून, त्यासाठी ३०० कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचे घाटत आहे. मात्र, त्यास प्रशासनाचा नकार असून, शिवसेना तसेच काँग्रेस पक्षाने त्यास विरोध केला आहे. सत्तारूढ भाजपकडून नागरी कामे होत नसल्याचे भांडवल केले जात असले तरी जी कामे अंदाजपत्रकीय सभेत मंजूर करण्यात आली आहे. ती कामे होणे अपरिहार्य आहे असे प्रशासनाचे म्हणणे असून, त्यामुळेच त्यांनी जानेवारी महिन्यातच तब्बल २५० कोटी रुपयांच्या कामाच्या निविदा मागविल्या आहेत. या कामांच्या निविदा मंजूर होणार असल्या तरी कामे सुरू होऊन देयके पुढील आर्थिक वर्षातच देण्याचे नियेाजन आहे. त्यामुळे आत्ता लगेचच देयके द्यावी लागणार नसल्याने या निविदा मागविण्यात आल्या आहेत. २५० कोटी रुपयांचे उड्डाण पूलप्रशासनाने २५० कोटी रुपयांचे दोन उड्डाणपूलदेखील करण्यास प्रशासनाने तयारी केली असून, त्याच्या निविदा मागविल्या आहेत. यापुलांची कामे अजून सुरू होणे बाकी असून, तीदेखील पुढील आर्थिक वर्षात सुरू हेाण्याची शक्यता असल्यानेच प्रशासनाने निविदा मागविल्या आहेत. मायको सर्कल आणि सिडकोतील त्रिमूर्ती चौकात हे उड्डाण पूल बांधणे नियोजित आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाroad transportरस्ते वाहतूक