शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
4
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
5
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
6
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
7
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
8
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
9
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
10
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
11
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
12
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
13
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
14
Navi Mumbai: तीन मित्रांच्या जीवावर बेतली पावसाळी सहल 
15
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
16
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
17
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
18
IPO: 'स्वप्न विकणारे' आयपीओ ठरले फसवे, रिटर्न्समध्ये गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग !
19
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
20
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली

मुदत संपण्यापूर्वीच निविदाप्रक्रिया राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 17:42 IST

नाशिक : कोणत्याही ठेक्याची मुदत संपण्यापूर्वीच तीन महिने अगोदर निविदाप्रक्रिया राबविण्याचे स्पष्ट आदेश स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी प्रशासनाला पुन्हा एकदा दिले. यावेळी मनपा कर्मचाºयांसाठी रेनकोट खरेदी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना करतानाच अत्यावश्यक औषधांची खरेदी आयुक्तांच्या अधिकारात करून उर्वरित खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्याचेही आदेशित करण्यात आले. दरम्यान, ...

नाशिक : कोणत्याही ठेक्याची मुदत संपण्यापूर्वीच तीन महिने अगोदर निविदाप्रक्रिया राबविण्याचे स्पष्ट आदेश स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी प्रशासनाला पुन्हा एकदा दिले. यावेळी मनपा कर्मचाºयांसाठी रेनकोट खरेदी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना करतानाच अत्यावश्यक औषधांची खरेदी आयुक्तांच्या अधिकारात करून उर्वरित खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्याचेही आदेशित करण्यात आले. दरम्यान, सदस्यांनी सुमारे दीड कोटी रुपयांच्या औषध खरेदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.स्थायी समितीच्या सभेत तारांगण प्रकल्प पीपीपी तत्त्वावर चालविण्यास देणेपूर्वी एक वर्षासाठी पूर्वीच्याच मक्तेदाराकडून काम करून घेण्याचा विषय चर्चेला आला असता, शशिकांत जाधव यांनी महापालिकेला या प्रकल्पापासून आजवर किती उत्पन्न मिळाले, याचा लेखाजोखा सादर करण्याची सूचना प्रशासनाला केली. यावेळी शहर अभियंता उत्तम पवार यांनी सन २००७ पासून सुरू झालेल्या तारांगण प्रकल्पाच्या माध्यमातून आतापर्यंत ५० लाख रुपये उत्पन्न प्राप्त झाल्याचे सांगितले. मात्र, देखभाल-दुरुस्तीवर दोन कोटी २० लाख रुपये खर्च झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सभापतींनी पीपीपी तत्त्वावर लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. याचवेळी, मनपा कर्मचाºयांना रेनकोट देण्यासंबंधीचा विषय चर्चेला आला असता प्रवीण तिदमे यांनी पावसाळ्यातील दोन महिने संपल्यानंतर आता रेनकोट खरेदीची प्रक्रिया राबविली जात असल्याबद्दल खेद व्यक्त केला. पावसाळ्यापूर्वीच निविदाप्रक्रिया का राबविली नाही, याचा जाबही त्यांनी विचारला. यावेळी प्रशासन उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी गेल्या दीड वर्षांपासून सदरची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत दोन ते तीन वेळा फेरनिविदाही काढण्यात आल्याचे स्पष्ट केले. त्यावर सभापतींनी ठेका संपण्यापूर्वीच तीन महिने अगोदर निविदाप्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशित केले.