शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षांपासून ‘त्यांना’ प्रतीक्षा कायम होण्याची

By admin | Updated: June 15, 2014 00:28 IST

हंगामी कर्मचारी : महाबॅँक नवनिर्माण सेना आंदोलनाच्या पावित्र्यात

 

नाशिक : जिल्ह्यातील महाराष्ट्र बॅँकेच्या विविध शाखांमध्ये गेल्या दहा वर्षांपासून सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले हंगामी कर्मचारी अद्यापही कायम होण्याच्या प्रतीक्षेत असून, याबाबत महाबॅँक व्यवस्थापनाने तातडीने निर्णय न घेतल्यास महाबॅँक नवनिर्माण सेना आंदोलन छेडणार असल्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष उमाकांत कोटणीस यांनी दिला. नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्र बॅँकेच्या एकूण ८९ शाखांपैकी ५४ शाखांमध्ये सफाई कामगार या पदावर हंगामी कर्मचारी म्हणून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. जुना आग्रा रोडवरील कालिका मंदिर सभागृहात सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ होते. यावेळी कोटणीस म्हणाले, महाराष्ट्र बॅँक ही सार्वजनिक बॅँक असून, बॅँकेत कर्मचाऱ्यांना वेतन करार हा व्दिपक्षीय करारानुसार दिला जातो. परंतु महाराष्ट्र बॅँकेत अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागेवर बॅँकेने हंगामी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. बॅँकेच्या विविध शाखांमध्ये ५० ते ५५ हंगामी कर्मचारी कार्यरत असून, त्यांना केवळ १०० ते २०० रुपये दररोज पगार दिला जातो. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून अशा तुटपुंज्या पगारावर हे कर्मचारी सेवा बजावत आहेत. यामध्ये काही महिलांचादेखील समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. या कर्मचाऱ्यांना वेठबिगाऱ्याप्रमाणे वागणूक मिळत असून, बॅँकेने या कर्मचाऱ्यांना कायम करावे व त्यांच्या पगारात वाढ करावी, यासाठी संघटना पाठपुरावा करत असून, व्यवस्थापनाकडून आश्वासनांपलीकडे काहीच मिळत नसल्याने यापुढील काळात संघटना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे कोटणीस यांनी यावेळी स्पष्ट केले. महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनीही संघटनेने घेतलेल्या पावित्र्यास पाठिंबा दर्शविला असून, लवकरच बॅँकेच्या महाप्रबंधकांची भेट घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे राज्य संघटन सचिव दिनेश खाडे, नाशिक संघटन सचिव सुरेश रहाटळ उपस्थित होते. (प्रतिनिधी)