शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यसंस्कारासाठी महापालिकेला दहा टन बायोकोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:19 IST

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याने अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर लाकडाचा ...

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याने अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर लाकडाचा कमीत कमी वापर व्हावा यासाठी एका कंपनीने नाशिक महापालिकेला तब्बल दहा टन बायोकोल मोफत दिले आहेत.

पंचवटी अमरधाम येथे महापौर सतीश कुलकर्णी तसेच आमदार ॲड. राहुल ढिकले तसेच अन्य नगरसेवकांच्या उपस्थितीत हे बायोकोल महापालिकेला देण्यात आले.

नाशिक शहरातील नाशिक आणि पंचवटी या दोन्ही अमरधाममध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर विद्युत व डिझेल शवदाहिनीत उपचार केले जात असले तरी पारंपरिक बेडचाही वापर होतो. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडांचा वापर खूप होत आहे. लाकडांसाठी वृक्षतोड केली जाते व पर्यायाने पर्यावरणाचा ऱ्हास होतो म्हणून अंत्यविधीसाठी लागणाऱ्या लाकडाला पर्याय म्हणून स्वामी समर्थ बायोकोल बिकेटस कंपनीने दहा टन बायोकोल दिले. हे बायोकोल बिकेट्स शेंगा टरफल, लाकडी भुसा, मका बिट्टी, झाडांचा पालापाचोळा यापासून तयार करण्यात आले आहे. त्यांची ज्वलन क्षमता ही लाकडापेक्षा जास्त असून जाळल्यानंतर कार्बन डाय ऑक्साईड तयार होत नाही म्हणजेच प्रदूषण होत नाही आणि त्यामुळे त्यांचा वापर अंत्यसंस्काराच्या वेळी करण्यात येणार आहे. या कंपनीचे संचालक सचिन मोहिते, प्रकाश भोये, मधुसुदन वाडे यांनी सामाजिक बांधिलकी या भावनेतून बायाेकोल सुपुर्द केले. या वेळी कंपनीच्या अन्य अधिकाऱ्यांबरोबरच भाजपचे नगरसेवक प्रशांत जाधव, सुनील केदार, शहर सचिव अमित घुगे, धनंजय माने, चंद्रशेखर पंचाक्षरी आदी उपस्थित होते.

छायाचित्र आरफोटोवर २९ बायोकोल नावाने..

अंत्यविधीसाठी लाकडांना पर्याय म्हणून पंचवटी अमरधाम येथे बायोकोल बिकेट्स देण्यात आले. या वेळी उपस्थित महापौर सतीश कुलकर्णी, आ. राहुल ढिकले, गिरीश पालवे, सचिन मोहिते, प्रकाश भोये, प्रशांत जाधव, अमित घुगे, सुनील केदार आदी.