शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

दहा हजार सैनिक मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 00:59 IST

सैन्य सेवेतील मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क वेळेत व सुलभरीत्या बजावता यावा यासाठी इटीपीबीएस ही संगणकीय प्रणाली भारत निवडणूक आयोगामार्फत विकसित करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील एकूण ९८०७ सैन्य मतदार या प्रणालीद्वारे मतदान करणार आहेत.

ठळक मुद्देइटीपीबीएस प्रणाली : आॅनलाइन मतपत्रिका पाठविणार

नाशिक : सैन्य सेवेतील मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क वेळेत व सुलभरीत्या बजावता यावा यासाठी इटीपीबीएस ही संगणकीय प्रणाली भारत निवडणूक आयोगामार्फत विकसित करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील एकूण ९८०७ सैन्य मतदार या प्रणालीद्वारे मतदान करणार आहेत.आयोगामार्फत तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिकली पोस्टल बॅलेट सिस्टीम संगणक प्रणालीच्या माध्यमातून सैन्य दलातील मतदारांसाठीच्या मतपत्रिका त्यांच्या पोस्टिंगच्या ठिकाणी आॅनलाइन पद्धतीने पाठविण्यात येतात. या मतपत्रिका पोचल्यानंतर त्या मतमोजणीच्या दिवसापर्यंत सकाळी ८ वाजेपर्यंत पोस्टाने मिळणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील सैन्य मतदारांच्या मतपत्रिका या गेल्या ७ तारखेलाच रवाना झालेल्या आहेत.२४ हजार युवक करणार पहिल्यांदाच मतदानआॅक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी सप्टेंबर महिन्यात १८ वर्ष पूर्ण झालेल्या मतदारांसाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील सुमारे २४,५०० मतदार नवमतदारांची नावे नोंदविण्यात आली आहेत. त्यामुळे सदर मतदारांचे हे पहिले मतदान असणार आहे. या नवीन मतदारांच्या नोंदणीनंतर जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या आता ४५ लाख ५८ हजार १८६ इतकी झाली आहे. अंतिम मतदारयादी जाहीर होऊनही आयोगाने नवमतदारांसाठी ४ आॅक्टोबरपर्यंत नवमतदारांना नाव-नोंदणीची मुदत दिली होती. या तारखेपर्यंत जिल्ह्यातून सुमारे २४ हजार नवमतदार पुढे आले आहेत.नाशिक पश्चिममध्ये दोन बॅलेट युनिटचा वापर४शहरातील नाशिक पश्चिम या मतदारसंघात १९ उमेदवार असल्याने या मतदारसंघात दोन बॅलेट युनिटवर मतदान घेतले जाणार आहे. एखाद्या मतदारसंघात पंधरापेक्षा अधिक उमेदवार राहिल्यास अशा ठिकाणी दोन बॅलेट युनिटचा वापर करावा लागतो. त्यानुसार जिल्ह्यात नाशिक पश्चिम या एकमेव मतदारसंघात दोन युनिट वापरण्यात येणार आहे. एका ईव्हीएम मशीनमध्ये पंधरा उमेदवारांचे आणि एक नोटा अशी १६ बटणं असतात. त्यापेक्षा अधिक उमेदवार असल्यास दोन ईव्हीएमची दोन युनिट वापरावी लागणार आहेत. पंधरापेक्षा जास्त उमेदवार असल्यामुळे या ठिकाणी दोन बॅलेट युनिट मतदानासाठी वापरले जाणार आहेत.मतदानासाठी आवश्यक ओळखपत्रभारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल अशावेळी पुढील अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल.४पासपोर्ट (पारपत्र).४वाहनचालक परवाना.४छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्र म).४सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र.४छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक.४पॅनकार्ड.४राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती, निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड.४मनरेगा जॉबकार्ड.४कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड.४छायाचित्र असलेले निवृत्तिवेतन दस्तावेज.४खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र.४आधारकार्ड.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान