शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिलपासून नाशकातच रोज दहा हजार कोरोनाच्या चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 00:48 IST

नाशिक - शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता गेल्या वर्षी पहिला रुग्ण आढळल्यानंतर रुग्णसंख्या टीपेला असताना ज्या पद्धतीने कार्यवाही करण्यात आली, त्याच धर्तीवर पुन्हा प्रतिबंधित क्षेत्र आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या आहेत.

ठळक मुद्देगमे यांच्याकडून आढावा : लॅबची क्षमता वाढणार

नाशिक - शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता गेल्या वर्षी पहिला रुग्ण आढळल्यानंतर रुग्णसंख्या टीपेला असताना ज्या पद्धतीने कार्यवाही करण्यात आली, त्याच धर्तीवर पुन्हा प्रतिबंधित क्षेत्र आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या आहेत.दरम्यान, कोरोना चाचणीनंतर प्रयोगशाळेतील अहवाल विलंबाने प्राप्त होत असले तरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळेची क्षमता वाढ आणि महापालिकेची नवीन प्रयोगशाळा कार्यान्वित होत असल्याने एप्रिल महिन्यापासून सुमारे दहा हजार चाचण्या रोज नाशिकमधील प्रयोगशाळेतच होणार असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सोमवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालयात आपात्कालीन व्यवस्थापन केंद्राच्या प्रमुखांची बैठक घेतली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली.सध्या कोरोनाबाधित गृहविलगीकरणात मोठ्या प्रमाणात राहत असून त्यांच्याबाबत विशेष काळजी घेऊन संसर्ग रोखण्यात येईल, तसेच कोविड केअर सेंटर, डीसीएच, डीसीएसीदेखील गेल्या वेळीप्रमाणेच सुरू करण्यात येईल.ज्या भागात मोठ्या प्रमाणात आढळत आहेत, त्याच भागात कोविड केअर सेंटर्स सुरू करण्याची सूचना यावेळी गमे यांनी दिली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळेची क्षमता सध्या केवळ ८०० चाचण्यांचे अहवाल देण्याची आहे. ती आता वाढविण्यात येत असून त्यामुळे पाच हजार चाचण्यांची क्षमता या प्रयोगशाळेत होईल.२५ मार्चच्या आत महापालिकेच्या बिटको रुग्णालयातील लॅबही कार्यान्वित होणार असून, या प्रयोगशाळेची क्षमताही पाच हजार नमुने तपासणी प्रतिदिन असल्याने एका दिवसात दहा हजार नमुन्यांची तपासणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. या दोन्ही प्रयोगशाळांची क्षमता वाढणार असल्याने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि घसा स्राव नमुने तपासणीचे काम आणखी सोपे होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.बैठकीस महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस आयुक्त बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिवदे, आपात्कालीन कक्षाच्या समन्वयक उपजिल्हाधिकारी वासंती माळी आदी उपस्थित होते.पोलिसांना स्वतंत्र कारवाईचे आदेशपोलीस यंत्रणा ही अन्य शासकीय यंत्रणेबरोबर काम करीत असली तरी, या विभागाने आपत्ती व्यवस्थापन कायद्यासंदर्भातील निर्बंधाची अंमलबजावणी स्वयंस्फूर्तीने करावी आणि कार्यवाहीबाबतचे दैनंदिन अहवाल आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे रोज पाठवावेत, असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.निर्बंधात आणखी वाढ नाहीगर्दीवर टाकण्यात येणाऱ्या निर्बंधाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्यात कोणतीही वाढ किंवा घट केली जाणार नाही. तसेच हेच निर्बंध पुढेही सुरू राहतील असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. गृहविलगीकरणात असणाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मांढरे यांनी दिला.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयcorona virusकोरोना वायरस बातम्या