शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दहा-पंधरा जागांची ‘एनएसयूआय’ची मागणी

By admin | Updated: January 22, 2017 23:22 IST

महापालिका निवडणूक : एनएसयूआय बैठक; पदाधिकाऱ्यांचे आश्वासन

नाशिक : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होवो अथवा न होवो नॅशनल स्टुडंट युनियन आॅफ इंडियाचे (एनएसयूआय) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपली संपूर्ण ताकद पक्षाने दिलेल्या उमेदवारापाठीमागे उभी करावी़ काँग्रेसमुळे मोठे झालेले व पक्ष सोडून गेलेल्या ज्येष्ठांमुळे युवा वर्गाला एक प्रकारे संधी निर्माण झाली आहे़ एनएसयूआय व युवक काँग्रेसने महापालिकेसाठी मागणी केलेल्या पंधरा जागांबाबत पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरण्यात येईल, असे आश्वासन रविवारी शहराध्यक्ष शरद अहेर यांनी दिले़काँग्रेस कमिटीत रविवारी (दि़२२) पार पडलेल्या एनएसयूआय संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत अहेर बोलत होते़ युवकांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, राज्यात आणि केंद्रात भाजपाची सत्ता असल्याने त्यांच्याकडे सर्वच पक्षांतील नेत्यांचे इनकमिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे़ त्यास काँग्रेस पक्षातील काही नेते वा कार्यकर्तेही अपवाद नाहीत़ यामुळे पक्षाचे नुकसान झाले असले तरी युवकांची दुसरी फळी तयार असून, त्यांना यानिमित्ताने संधी प्राप्त झाली आहे़महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून झालेल्या या मेळाव्यात नाशिक जिल्हाध्यक्ष नितीन काकड यांनी पक्षाने एनएसयूआय व युथ काँग्रेसमिळून किमान पंधरा जागांवर उमेदवारी देऊन युवा नेतृत्वास संधी देण्याची मागणी केली़ तसेच पक्षाच्या अडचणीच्या काळात एनएसयूआय व युथ काँग्रेससोबत राहणार असल्याची ग्वाही दिली़ यावेळी एनएसयूआयचे नाशिक जिल्हाध्यक्ष नितीन काकड, उपाध्यक्ष राहुल कदम, कुशल लुथरा, सचिन भुजबळ, सुनील आव्हाड, चित्रा लोखंडे, माजी उपमहापौर गुलाम शेख, सेवादलाचे वसंत ठाकूर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)