शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांनंतर रेशन दुकानदारांचा संप स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:44 IST

गेल्या दहा दिवसांपासून शहर व जिल्ह्यात सुरू असलेला रेशन दुकानदारांचा संप अखेर तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. गणेशोत्सव, बैलपोळा, गोपाळकाळा यांसह अन्य सण आल्याने गोरगरिबांची गैरसोय नको म्हणून, हा संप स्थगित करण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

नाशिक : गेल्या दहा दिवसांपासून शहर व जिल्ह्यात सुरू असलेला रेशन दुकानदारांचा संप अखेर तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. गणेशोत्सव, बैलपोळा, गोपाळकाळा यांसह अन्य सण आल्याने गोरगरिबांची गैरसोय नको म्हणून, हा संप स्थगित करण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.दरम्यान, जिल्हा पुरवठा विभागाने १० आॅगस्टनंतर संप सुरू राहिल्यास रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी सणासुदीचे कारण देत हा संप मागे घेण्यात आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे राज्यातील रेशन दुकानदारांचा संप सुरूच आहे. रेशन दुकानदारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १ आॅगस्टपासून रेशन दुकानदारांनी बेमुदत संप पुकारला होता. दहा दिवसांपासून संप सुरू असल्याने विशेषत: ग्रामीण भागात गोरगरिबांना रेशनचे धान्य मिळणे अवघड झाले होते. मात्र गुरुवारी (दि.१०) आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा खात्याच्या विनंतीनुसार तसेच गोरगरिबांची ऐन सणासुदीच्या काळात गैरसोय नको, या कारणांमुळे संप तूर्तास मागण्या कायम ठेवून स्थगित करण्यात आल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे, प्रल्हाद जाधव यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान यामुळे गोर गरीबांचे मात्र गैरसोय टळणार आहे.