शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाधिकाऱ्यांचा पदभार तात्पुरता काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 01:28 IST

शाळा दुरुस्तीसाठी राज्य शासनाकडून कोट्यवधीचा निधी प्राप्त होऊनही सदर विषयाची फाइल तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी अडवून ठेवल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी मोठा गोंधळ झाला. सभापतींसह सदस्यांनी थेट अध्यक्षांच्या आसनासमोरच जमिनीवर ठिय्या मारल्याने अखेर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांचा तात्पुरता पदभार काढून घेण्याबरोबरच विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्याची घोषणा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना करावी लागली.

नाशिक : शाळा दुरुस्तीसाठी राज्य शासनाकडून कोट्यवधीचा निधी प्राप्त होऊनही सदर विषयाची फाइल तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी अडवून ठेवल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी मोठा गोंधळ झाला. सभापतींसह सदस्यांनी थेट अध्यक्षांच्या आसनासमोरच जमिनीवर ठिय्या मारल्याने अखेर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांचा तात्पुरता पदभार काढून घेण्याबरोबरच विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्याची घोषणा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना करावी लागली.जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर चर्चा होत असताना महेंद्रकुमार काले यांनी जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांचे वर्तन व फाइलींच्या प्रवासाच्या विषयाला वाचा फोडली.माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्याकडे एका कामानिमित्त व्यक्ती पाठविली असता, त्यांनी जिल्हा परिषदेच्या सदस्याकडून कामे करून घेतो काय असे सांगून संबंधित व्यक्तीचा अवमान केल्याची तक्रार केली. काले यांनी एकामागोमाग तकारींचा पाढा वाचायला सुरुवात केल्यावर उपाध्यक्ष नयना गावित, उदय जाधव, संजय बनकर आदींनी अधिकाºयाचे नाव सांगा, अशी मागणी केली. त्यावर स्वत: नितीन बच्छाव यांनी उभे राहून झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मात्र त्याचवेळी शिक्षण सभापती यतिन पगार यांनी आपल्याला अशाच प्रकारे गेल्या तीन महिन्यांपासून प्रशासनाचा अनुभव येत असल्याचे सांगून, आपल्या फाइली बाजूला ठेवून दिल्या जात असून, मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्या फाइलींवर स्वाक्षरी करीत नसल्याचा आरोप केला. जिल्हा परिषदेचे कामे सुरू करण्यासाठी ‘टोकन ग्रॅण्ड’ची पद्धत अवलंबिली जात असल्याच्या कारणामुळे सर्व कामे ठप्प झाल्याचे सांगितले. राज्य सरकारकडून आपण शाळा दुरुस्तीसाठी निधी आणूनदेखील अद्यापही शाळांची दुरुस्ती केली जात नाही, अशी तक्रार केली. जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून आपल्याला आठ वर्षे झाली असून, असा कारभार आजवर पाहिला नाही, सभापती असल्यामुळे अडीच वर्षे मनातील दु:ख सांगू शकलो नाही, परंतु यापुढे नवीन पदाधिकाºयांना प्रशासनाच्या वाईट कामाचा अनुभव येऊ नये म्हणून आपण आज सभागृहात आपली भावना व्यक्त करीत असल्याचे पगार म्हणाले, तर उदय जाधव यांनी, मुख्य कार्यकारी अधिकारी काही विशिष्ट फाइलींवरच स्वाक्षºया करीत असल्याचा आरोप केला. सदस्यांच्या भावना पाहून अध्यक्ष सांगळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांना खुलासा करण्यास सांगितले असता, त्यांनी फाइलींचा प्रवास का लांबला याची चौकशी करून शिक्षणाधिकाºयांच्या बदलीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवू, असे आश्वासन दिले. परंतु त्यावर सदस्यांचे समाधान झाले नाही. शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी शाळा दुरुस्तीसाठी सर्व शिक्षा अभियानाचे अभियंत्यांकडे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी दिले, परंतु त्यांनी उशिरा अंदाजपत्रक दिल्यामुळे फाइलीला उशीर झाल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र ते ऐकून घेण्याच्या कोणीही मन:स्थितीत नव्हते.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदEducationशिक्षण