शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कलेचे मंदिर कलेलाच मारक ठरायला नको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 01:00 IST

नाशिक : शहरातील सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असणाऱ्या महाकवी कालिदास कलामंदिरचे अव्वाच्या सव्वा भाडे वाढविण्यात आले आहे. या गोष्टीला रंगकर्मींच्या वर्तुळातून विरोध होत आहे.

ठळक मुद्देकालिदास कलामंदिर : दरवाढीमुळे रंगकर्मी संतप्त

नाशिक : शहरातील सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असणाऱ्या महाकवी कालिदास कलामंदिरचे अव्वाच्या सव्वा भाडे वाढविण्यात आले आहे. या गोष्टीला रंगकर्मींच्या वर्तुळातून विरोध होत आहे.कालिदासची दरवाढ झाल्याने आजवर जोपासले जाणारे कलेचे वातावरण क्षणात नाहीसे होऊन तेथे व्यावसायिकता वाढीस लागणार आहे. याचा फटका नाट्यकर्मींना तर बसेलच पण नाशिककर रसिकांनाही त्याची झळ बसणार आहे. त्यामुळे कालिदासची भाडेवाढ मागे घ्यावी, अशा भावना कलाकार, दिग्दर्शक आदींच्या प्रतिनिधींनी बोलून दाखविल्या. याबाबत त्यांच्याशी साधलेला हा संवाद.कालिदासची भाडेवाढ एवढी करायला नको. येथे आधी जेवढे प्रयोग व्हायचे, प्रायोगिक नाटकांसाठी ज्या सवलती दिल्या जायच्या त्यामुळे नाट्यकलेचे संवर्धन होत होते. ते आता होणार नाही. त्यामुळे ही भाडेवाढ मागे घेतलीच पाहिजे.- गणेश सरकाटे, नाट्य व दूरचित्रवाणी अभिनेतामहाकवी कालिदास कलामंदिरचे वाढवलेले भाडे फारच जास्त आहे. मी पुणे, मुंबई येथेही नाट्यप्रयोग करतो. पण तिथलेही दर इतके जास्त दिसत नाहीत. कालिदासला वाढ करायचीच होती तर टप्प्याटप्प्याने करायची होती. एकदम करायला नको होती. मी एका स्पर्धेसाठी नुकताच नंदुरबारला गेलो होतो. तेथील नाट्यगृहात सकाळ सत्रासाठी ११ हजार रुपये भाडे वाढविण्यात आले. आता त्या नाट्यगृहात नाटक वगैरे होतच नाही. फक्त शोकसभा, संमेलने वगैरेसारखे कार्यक्रम होतात. ही गत कालिदासची व्हायला नको.- विक्रम गवांदे, दिग्दर्शककालिदासचे वाढलेले भाडे कुणालाच परवडणारे नाही. यातून स्थानिक कलाकार, हौशी रंगकर्मी यांना तर काही संधीच राहणार नाही. हौशी नाट्यकर्मींना एवढे पैसे देऊन नाटक करणे शक्य नसते. त्यातून कलेला वावच रहाणार नाही. ही भाडेवाढ मागे घेतली गेली पाहिजे.- अपूर्वा कुबल, कलाकार, लोकहितवादी संघकालिदास कलामंदिरची भाडेवाढ एवढ्या मोठ्या प्रमाणात का, कुणी केली, कुणाशी चर्चा करून केली हेच समजत नाही. शहरात तीन चांगल्या नाट्यगृहांची गरज असताना आणि आता नूतनीकरण झाले असताना अचानक एवढी भाडेवाढ करणे अयोग्य आहे. यामुळे शहरातल्या सांस्कृतिक वातावरणाला त्याचा मोठा फटका बसणार आहे. नाशिककरांना अशी स्मार्ट सिटी मिळणार असेल तर ती नको आहे. महापालिकेने सांस्कृतिक गरज म्हणून कालिदासकडून आर्थिक फायद्याची अपेक्षा ठेवली नाही तर काय हरकत आहे?- सचिन शिंदे, अभिनेता, दिग्दर्शकनाट्यगृहाचे भाडे किती असावे ते ठरवण्याचे, ते योग्य पद्धतीने आकारण्याचे काम त्या त्या ठिकाणचे सत्ताधारी, प्रशासनाधिकारी करत असतात. त्यांच्यावर विश्वास ठेवून बघावा. पण हौशी रंगकर्मींच्या ज्या काही मागण्या आहेत, त्यासाठी आम्ही निवेदन देऊन, पाठपुरावा करू. हौशी रंगकर्मींना किती दिवस मोफत नाट्यगृह देणार? काय काय सुविधा देणार हे बघितले जाईल. शासनाच्या विरोधात जाण्यापेक्षा त्यांच्याबरोबर बोलून, त्यांना पटवून देऊन आपण आपला प्रामाणिक हेतू साध्य करून घेऊ शकतो, असे मला वाटते.- नूपुर सावजी, नाट्य व सिने कलाकार