शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
3
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
4
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
5
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
6
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
7
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
8
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
9
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
10
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
11
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
12
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
13
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
14
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
15
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
16
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
17
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
18
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
19
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
20
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा

‘ताप’दायक ठरतोय उन्हाळा : तपमानाचा पारा सातत्याने चढता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:31 AM

राज्यात उष्णतेची लाट वाढली असून, कमाल तपमानाचा पारा सातत्याने चढता असल्याने नाशिककरांना यंदाचा उन्हाळा तापदायक ठरू लागला आहे. एप्रिलमध्ये तीनवेळा पारा चाळिशीपार गेल्याने नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा अनुभवयास येत आहे. गेल्या शुक्रवारी (दि.२७) हंगामातील उच्चांकी ४०.५ इतके कमाल तपमान नोंदविले गेले.

नाशिक : राज्यात उष्णतेची लाट वाढली असून, कमाल तपमानाचा पारा सातत्याने चढता असल्याने नाशिककरांना यंदाचा उन्हाळा तापदायक ठरू लागला आहे. एप्रिलमध्ये तीनवेळा पारा चाळिशीपार गेल्याने नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा अनुभवयास येत आहे. गेल्या शुक्रवारी (दि.२७) हंगामातील उच्चांकी ४०.५ इतके कमाल तपमान नोंदविले गेले.  मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तपमान अधिक असल्यामुळे नाशिककर सध्या प्रचंड ‘हॉट एप्रिल’चा अनुभव घेत आहे. आठवडाभरापासून तपमान ३७ ते ४० अंशांच्या जवळपास राहत असल्याने प्रखर ऊन जाणवत आहे. शुक्रवारी पारा थेट ४०.५ अंशांपर्यंत गेल्याने नाशिककर घामाघुम झाले होते. एप्रिलचे दोन दिवस शिल्लक राहिले असून, मे महिना उजाडणार आहे. यामुळे तपमानाचा पारा असाच चढता राहिल्यास मे मध्ये उन्हाचा अधिक तडाखा नागरिकांना बसू शकतो.गेल्या वर्षाचा अखेरचा आठवडा दिलासादायकगेल्या वर्षी एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात नाशिककरांना उन्हाच्या झळांपासून काहीसा दिलासा मिळाला होता. कारण चाळिशीवर पोहचलेले कमाल तपमान अखेरच्या आठवड्यात ३६ ते ३८ अंशांच्या जवळपास होते. २० एप्रिल २०१७ रोजी कमाल तपमान ३८.४ अंश तर ३० एप्रिल २०१७ रोजी ३६.७ अंश इतके नोंदविले गेले होते. तसेच यावर्षी २७ तारखेला ४०.५ अंश तर गेल्या वर्षी याच तारखेला ३८.१ अंश इतक्या तपमानाची नोंद झाली होती. एप्रिलचे अजून दोन दिवस शिल्लक असून, तपमानाचा पारा ४१ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.उष्णतेचा दाह; खबरदारी आवश्यकशहराचे कमाल तपमान ४१ अंशांच्या जवळ पोहोचले आहे. शुक्रवारी नाशिककर अक्षरक्ष: भट्टीत भाजून निघाले. कारण मालेगाव ४४ तर नाशिक शहरात ४०.५ अंश इतके कमाल तपमान नोंदविले गेले. या वाढत्या तपमानामुळे उन्हाच्या झळा वाढल्याने नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेणे आवश्यक आहे. शक्यतो नागरिकांनी उन्हामध्ये घराबाहेर पडणे टाळावे. पाणी अधिकाधिक पिण्यावर भर द्यावा, मात्र फ्रीजमधील अतिथंड पाणी पिणे टाळावे. फळे किंवा शीतपेयांवर थंड पाणी पिऊ नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. उन्हात जाण्याची गरज भासल्यास खबरदारी घ्यावी. उघड्या डोक्याने उन्हात फिरणे टाळावे. सनस्कीन क्रीम, हॅट, टोपी, स्कार्फ, हॅन्डग्लोज, दर्जेदार सनग्लासच्या वापरावर भर द्यावा.

टॅग्स :Temperatureतापमान