शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या सरींच्या हजेरीनंतर तपमानाचा पारा पुन्हा चढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:57 IST

शहराचे तपमान पावसाच्या सरींच्या हजेरीनंतर पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी संध्याकाळी शहरात रोहिणीचा वर्षाव झाला होता. रविवारपासून पुन्हा वातावरणातील दमटपणा वाढला असून, रविवारी दिवसभर ढगाळ हवामान होते. सोमवारी काही प्रमाणात नाशिककरांना ऊन जाणवले व कमाल तपमानाचा पारा ३७.२ अंशापर्यंत पोहचला.

नाशिक : शहराचे तपमान पावसाच्या सरींच्या हजेरीनंतर पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी संध्याकाळी शहरात रोहिणीचा वर्षाव झाला होता. रविवारपासून पुन्हा वातावरणातील दमटपणा वाढला असून, रविवारी दिवसभर ढगाळ हवामान होते. सोमवारी काही प्रमाणात नाशिककरांना ऊन जाणवले व कमाल तपमानाचा पारा ३७.२ अंशापर्यंत पोहचला.  शहराचे कमाल तपमान शनिवारी ३८ अंशावर होते. दिवसभर ढगाळ हवामान व दमटपणा प्रचंड प्रमाणात जाणवत होता. वातावरणात आर्द्रतेचे प्रमाणही वाढले होते. संध्याकाळपर्यंत हवेत ७२ टक्क्यांपर्यंत आर्द्रता वाढली होती. त्यामुळे रोहिणी नक्षत्राच्या काही सरींचा नाशिक करांवर वर्षाव झाला. ०.८ मि.मी. इतक्या पावसाची नोंद शनिवारी पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्राकडून करण्यात आली होती. जूनचे चार दिवस उलटले असून, पहिल्या दिवशीही कमाल तपमान ३८ अंश इतके होते. गेल्या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. ७ जूनपर्यंत ६१.४ मि.मी. इतका पाऊस नोंदविला गेला होता.  ३ जून रोजी संध्याकाळी नाशिककरांना पावसाने चांगलेच झोडपले होते. २४ तासांत ४८.८ मि.मी. इतक्या पावसाची नोंद गेल्या वर्षी जूनच्या चौथ्या दिवशी करण्यात आली होती. त्या तुलनेत यंदा जूनचा चौथा दिवस (दि. ४) कोरडाठाक गेला. एकूणच मागील वर्षी रोहिणीची दमदार हजेरी नाशिककरांनी अनुभवली होती. यावर्षी रोहिणी नक्षत्रामध्ये निराशा पदरी पडण्याची शक्यता वातावरणाच्या स्थितीवरून वर्तविली जात आहे. मृग नक्षत्राला येत्या शुक्रवारपासून (दि. ८) प्रारंभ होत असून, या नक्षत्रात पावसाची दमदार हजेरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :Temperatureतापमान