शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

सिंहस्थ कुंभपर्वाची दिमाखात सांगता

By admin | Updated: August 12, 2016 00:25 IST

वेदमंत्रघोषात धर्मध्वजावतरण : नाशिक, त्र्यंबकेश्वरी मान्यवरांसह हजारो भाविकांची उपस्थिती

नाशिक/त्र्यंबकेश्वर : भारतीय सांस्कृतिक व धार्मिक महत्तेचे दर्शन घडविणाऱ्या आणि गेल्या तेरा महिन्यांपासून चैतन्याने भारलेल्या सिंहस्थ कुंभपर्वाची गुरुवारी रात्री ९.३१ वाजता नाशिकक्षेत्री रामकुंडावर, तर त्र्यंबकेश्वरी कुशावर्तावर धर्मध्वजावतरणाने सांगता झाली. वैश्विक उत्सव असलेल्या श्रद्धापर्वची वर्दी आणि साक्ष देणाऱ्या धर्मध्वजांचे अवतरण दोन्ही ठिकाणी दिमाखदार सोहळ्यात साधू-महंत यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. ‘हर हर महादेव’ आणि ‘सियावर रामचंद्र की जय’ या जयघोषाने गोदावरीच्या खळाळत्या प्रवाहात भाव-भक्तीही ओसंडून वाहिली. आता पुढील सिंहस्थ कुंभमेळा बारा वर्षांनी म्हणजे सन २०२७-२८मध्ये भेटीला येणार आहे.१४ जुलै २०१५ रोजी सकाळी ६.१६ वाजता गुरु आणि रवि ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला त्याचवेळी नाशिकला रामकुंडावर, तर त्र्यंबकेश्वरनगरीत तीर्थराज कुशावर्तावर धर्मध्वजारोहण झाले होते. गुरुवारी (दि. ११) रात्री ९.३१ वाजता गुरुचा सिंह राशीत प्रवेश झाला आणि दोन्ही ठिकाणी गेल्या तेरा महिन्यांपासून डौलाने फडकणाऱ्या धर्मध्वजा विश्वकल्याणाची प्रार्थना करत उतरविण्यात आल्या. त्र्यंबकला भाजपा अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास व रोजगार हमीमंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री साध्वी निरंजना ज्योती, पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार महेश गिरी यांच्यासह विविध साधू-महंतांच्या उपस्थितीत हा सिंहस्थ ध्वजावतरण सोहळा पार पडला. त्यानंतर ध्वजाचे गोदावरीत विधिवत विसर्जन करण्यात आले.रामकुंडावर झालेल्या ध्वजावतरण सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, जलसंपदा आणि पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार बाळासाहेब सानप, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्यासह निर्मोही आखाड्याचे महंत राजेंद्रदास महाराज, निर्वाणी आखाड्याचे श्रीमहंत धरमदास महाराज, दिगंबर आखाड्याचे श्रीमहंत रामकिशोरदास महाराज, वारकरी संप्रदायाचे हभप रामकृष्ण लहवितकर महाराज, भक्तिचरणदास महाराज, वल्लभपीठाचार्य परेशजी महाराज, महंत सुधीरदास महाराज, लक्ष्मीनारायण बडा मंदिरचे श्रीमहंत रामसनेहीदास महाराज, खाकी आखाड्याचे महंत नरसिंगदास महाराज, रामदास महाराज, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, दिलीप शुक्ल आदि उपस्थित होते. नाशिकला रामकुंडावर आयोजित दिमाखदार सोहळ्यात सर्वप्रथम संकल्प करत गणपती पूजन, पुण्याहवाचन, वरुण पूजन, बृहस्पती आदिदेवतांसह तीर्थदेवतापूजन, देवतांना आवाहन, धर्मध्वजपूजन आदि धार्मिक उत्तर पूजा-विधी केल्यानंतर गंगा-गोदावरीची महाआरती करण्यात आली आणि रात्री ९.३१ वाजता वेदमंत्रघोषात धर्मध्वजावतरण करण्यात आले. याचवेळी विश्वशांतीसूक्त पठण करत विश्वकल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. पूजाविधीचे पौरोहित्य वैदिक धर्म सभेचे अध्यक्ष व वेदमूर्ती भालचंद्रशास्त्री शौचे, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, तसेच पंडित वैभव दीक्षित, कौस्तुभ शौचे, शांतारामशास्त्री भानोसे, दिनेशशास्त्री गायधनी, विनयशास्त्री गायधनी, अतुल गायधनी, शेखर शुक्ल या ब्रह्मवृंदांनी केले. धर्मध्वजावरोहण सोहळ्याप्रसंगी ‘सियावर रामचंद्रकी जय’, ‘अधर्म का नाश हो, विश्व का कल्याण हो’ या घोषणांनी विद्युत रोषणाईने उजळून निघालेला रामकुंड परिसर रोमांचित झाला. भाव-भक्तीने नटलेला हा धर्मसोहळा आपल्या काळजात साठविण्यासाठी नाशिककरांनी गोदाकाठ फुलून गेला होता. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरतीसिंहस्थ कुंभपर्वाची सांगता ध्वजावतरणाने झाली. यावेळी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीला पूरसदृशस्थिती होती. गांधीतलावावरून पाणी वाहत असल्याने आणि गोदावरी मंदिरापर्यंत पाणी असल्याने गोदावरी मंदिराच्या छतावरूनच ध्वजावतरण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते गोदावरीची महाआरती करण्यात आली. गोदावरीला पाणी असल्याने नाशिककरांनी जेथे जागा मिळेल तेथून हा सोहळा अनुभवला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरतीसिंहस्थ कुंभपर्वाची सांगता ध्वजावतरणाने झाली. यावेळी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीला पूरसदृशस्थिती होती. गांधी तलावावरून पाणी वाहत असल्याने आणि गोदावरी मंदिरापर्यंत पाणी असल्याने गोदावरी मंदिराच्या छतावरूनच ध्वजावतरण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते गोदावरीची महाआरती करण्यात आली. गोदावरीला पाणी असल्याने नाशिककरांनी जेथे जागा मिळेल तेथून हा सोहळा अनुभवला.